विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठी – अमराठी वादात मराठी बोलणार नाही अशी मुजोरी करणाऱ्या व्यापाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांनी फटकावल्यानंतर व्यापाऱ्यांनी मीरा-भाईंदर मध्ये मोठा मोर्चा काढला. मीरा-भाईंदर मध्ये मराठी माणसांपेक्षा आपणच मोठे आहोत, असे शक्ती प्रदर्शन व्यापाऱ्यांनी केले. त्यातून मराठी माणसांविरुद्ध वातावरण तापविले. त्यानंतर मनसेने देखील व्यापाऱ्यांपेक्षा मोठा मोर्चा काढायचा निर्णय घेतला. पण त्यामुळे पण हे सगळे प्रकरण आपल्या अंगलट येणार आणि व्यापाराचे मोठे नुकसान होणार हे लक्षात येताच मीरा-भाईंदरच्या व्यापाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त करून पोलिसांना माफीनामा लिहून दिला.
मात्र या मुद्द्यावरून मोठे राजकारण रंगले. मीरा भाईंदर मध्ये मोर्चा काढायची परवानगी मनसेने पोलिसांकडे मागितली मात्र पोलिसांनी मोर्चा दुसऱ्या मार्गावरून काढा, असे सांगून मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांचे समर्थन केले मनसेच्या काही लोकांना ताब्यात घेतले कारण काही वेगळी कारवाई करण्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मीरा-भाईंदर मध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. मनसेने दुसऱ्या मार्गावरून मोर्चा काढला तर परवानगी दिली जाईल असे ते म्हणाले.
या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसे प्रचंड आक्रमक झाली असून मीरा-भाईंदर मध्ये मोर्चा काढणारच असा निर्धार मनसैनिकांनी व्यक्त केला आहे त्याचबरोबर मीरा रोड मध्ये झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही मोर्चा काढतोय तो काय घोडबंदरला काढणार का?, असा खोचक सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला.
मनसेने या निमित्ताने मीरा-भाईंदर, ठाणे, नवी मुंबई, मुंबई परिसरातून मनसैनिकांना गोळा करून मोठी वातावरण निर्मिती चालवली त्याची धास्ती व्यापाऱ्यांनी घेऊन पोलिसांना माफीनामा लिहून दिला. आमच्या मोर्चामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आम्ही मराठी लोकांबरोबरच आहोत असे व्यापारी संघाने माफीनाम्यात लिहिले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App