विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : Minister Shivendra Raje Bhosale मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वंचितांचे ओबीसींचे नेते नाही तर मराठ्यांचे पण नेते आहेत. त्यांनी ओबीसी विरोधी भूमिका घेतली नाही. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता त्यांनी आरक्षण दिले आहे, असे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटले आहे. तसेच देवेंद्र फडणवीस हे हिमालयासारखे नेते आहेत, राजकारणासाठी त्यांनी समाजाचा वापर केला नाही, त्यामुळे आरक्षणासाठी कोण बोलत असेल त्याकडे दुर्लक्ष करा, असे भोसले यांनी म्हटले आहे. क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त सोहळ्यात बोलताना शिवेंद्रराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.Minister Shivendra Raje Bhosale
शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, राजे उमाजी नाईक यांची शासकीय जयंती व्हावी अशी मागणी होत होती. समाजाला दाबून ठेवण्याचे काम केले गेलं. समजून घेणारा नेता आला आणि जयंती आता साजरी होत आहे. देशात ज्यांनी अनेक वर्ष राज्य चालवले त्यांना जे जमले नाही ते मोदी यांनी केले. दिल्लीत शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांचे पुतळे मोदी पंतप्रधान झाल्यावर बांधले गेले. उमाजी नाईक यांची जयंती देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केली. ओबीसी मुलांचा विकास देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र आहे म्हणून झाला आहे. त्यांनी सांगितले की, फडणवीस यांना प्रश्नांची जाण आहे म्हणून थोपटे यांच्या कारखान्यांना 420 कोटी रुपये कर्ज दिले.Minister Shivendra Raje Bhosale
पुढे बोलताना शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, राजकीय पोळी भाजण्याचे काम करणाऱ्या लोकांनी ओबीसी आणि मराठा लोकांचा वापर केला. यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षांनी हे काम केले. मला मंत्री केले. आता माझ्या विभागाच्या वतीने इथे काम करता आले. त्याबद्दल बरे वाटले. स्मारक लवकरच होईल. रामोशी समाज आणि छत्रपती यांचे काही तरी काम करण्याची संधी मिळाली. आपण आपल्या माणसाला मोठे केले पाहिजे, असे भोसले म्हणाले.
दरम्यान, मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करताना त्याबद्दलचा मसुदा घेऊन जाताना शिवेंद्रराजे भोसले देखील उपस्थित होते. राधाकृष्ण विखे पाटील हे मराठा समाज उपसमितीचे अध्यक्ष असून त्यांच्यासोबत मंत्री माणिकराव कोकाटे तसेच उदय सामंत देखील उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App