विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ‘’हिंदुत्व आमच्या डीएनए मध्येच आहे पण उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा त्याग केला. आणि आता ते औरंगजेब फॅन क्लबचे म्होरक्या झाले आहेत. सत्तेसाठी हिंदुत्वाचा वारसा सोडून काँग्रेसच्या दारात जाऊन बसले. त्यामुळेच जनतेने तुम्हाला घरी बसण्याचे तुमचे आवडते काम दिले.’’ असं बावनकुळे म्हणाले आहेत.
तसेच ‘’आता हिंदुत्वावर बोलण्याचा तुम्हाला कुठलाही अधिकार उरलेला नाही. भाजपचा “सौगात-ए-मोदी” हा कार्यक्रम नाही, ही विकासाची गॅरंटी आहे. पंतप्रधान मोदीजी यांच्या सरकारने देशाला 24 तास वीज, पाणी, रस्ते, घरं आणि रोजगार दिला.’’ असं बावनकुळेंनी सांगितलं. Chandrashekhar Bawankule
याशिवाय ‘’उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या जनतेला काय दिले? मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर असताना ते घरात बसून राहिले आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांशी नाळ तोडून टाकली. अहोरात्र जनसेवेचा ध्यास घेऊन देशसेवा करणाऱ्या मोदीजींवर बोलण्याची उद्धव ठाकरे यांची पात्रता नाही.’’ अशी टीका केली.
याचबरोबर ‘’गुन्हेगार, बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्या आणि समाजविघातक तत्त्वांना सरंक्षण देणाऱ्या प्रवृत्तींचा मुख्यमंत्री फडणवीसजी कायद्याच्या मार्गाने व्यवस्थित बंदोबस्त करीत आहेत. पण आता हेच लोकं उद्धव ठाकरेंना का प्रिय झाले आहेत? याची उत्तरं आधी त्यांनी जनतेला द्यावीत.’’ असं म्हणत बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App