क्रिकेट वर्ल्ड कपच्या प्रत्येक सामन्यात स्टेडियम मधल्या प्रेक्षकांना मोफत मिनरल वॉटर; जय शाह यांची घोषणा


विशेष प्रतिनिधी

मुंबई : क्रिकेट वर्ल्ड कप दरम्यान भारताच्या अर्थव्यवस्थेत तब्बल 220 अब्ज रुपयांची भर पडणार असतानाच भारतीय क्रिकेट नियम मंडळ अर्थात बीसीसीआयने क्रिकेट वर्ल्ड कपच्या प्रत्येक सामन्यात प्रत्येक स्टेडियम मधल्या प्रेक्षकांना मोफत मिनरल वॉटर देण्याची घोषणा केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एका ट्विट द्वारे ही घोषणा केली.mineral water for spectators in stadiums in every match of Cricket World Cup; Jai Shah’s announcementक्रिकेट विश्व चषकादरम्यान वेगवेगळ्या माध्यमांमधून भारतीय अर्थव्यवस्थेत तब्बल 220 अब्ज रुपयांची भर पडणार असल्याचा अंदाज इकॉनॉमिस्टने व्यक्त केला आहे.

भारतात क्रिकेट विश्वचषक होण्याचा काळ हा ऑक्टोबर हिटचा आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय विश्वचषकाचे मुख्य आयोजक भारतीय क्रिकेट नियमक मंडळाने प्रेक्षकांच्या सोयीसाठी मोफत मिनरल वॉटर देण्याची घोषणा केली आहे. हे पाणी मिनरल वॉटर तर असेलच, पण ते पॅकही असेल, असेही जय शाह यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

भारतात क्रिकेट विश्वचषक स्पर्धा होणार असल्याने हॉटस्टारने त्याचे प्रक्षेपण सर्व जगभरातल्या प्रेक्षकांना मोफत उपलब्ध करून दिले आहे, ते आपल्या मोबाईलवर तसेच टीव्हीवर पाहता येईल. त्यानंतर बीसीसीआयने प्रत्येक सामन्या दरम्यान स्टेडियम मधल्या प्रेक्षकांना मोफत मिनरल वॉटर देण्याची घोषणा केली.

mineral water for spectators in stadiums in every match of Cricket World Cup; Jai Shah’s announcement

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात