विशेष प्रतिनिधी
मुंबई : Milind Deora आझाद मैदानात आंदोलनं होऊ नयेत अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिल्यानंतर, शिवसेना शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा चौफेर टीकेच्या भोवऱ्यात सापडले. विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केल्यामुळे आता त्यांनी आपल्या भूमिकेवरून माघार घेतली आहे.Milind Deora
दक्षिण मुंबईतील सीएसएमटी स्थानकाजवळ असलेले आझाद मैदान हे आंदोलकांचे मुख्य ठिकाण मानले जाते. नुकत्याच मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी याच मैदानावर बेमुदत उपोषण छेडले होते, ज्याला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. पाच दिवस मुंबई ठप्प होण्याची वेळ आल्यामुळे देवरा यांनी फडणवीस यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली होती.Milind Deora
पत्रात त्यांनी नमूद केले होते की, दक्षिण मुंबईत मंत्रालय, विधानसभा, बृहन्मुंबई महापालिका मुख्यालय, पोलीस कार्यालये, नौदल कमांड, तसेच आर्थिक आणि कॉर्पोरेट केंद्रे आहेत. येथे वारंवार होणारी आंदोलने आणि मेळावे प्रशासन, सुरक्षा आणि सामान्य नागरिकांच्या जीवनावर परिणाम करतात. त्यामुळे आंदोलने उच्च सुरक्षा आणि उच्च कार्यक्षम भागांपासून स्थलांतरित करण्याचा विचार करावा, अशी त्यांनी मागणी केली होती.
मात्र, विरोधकांकडून झालेल्या टीकेनंतर देवरा यांनी ट्विटरवर स्पष्टीकरण देत म्हटले की, आंदोलन करणे हा प्रत्येक भारतीयाचा घटनात्मक अधिकार आहे. माझ्या पत्राचा उद्देश आंदोलन बंद करणे नव्हता, तर ती शिस्तबद्ध पद्धतीने व्हावीत आणि कष्टकरी मुंबईकरांना त्रास होऊ नये हा होता. तसेच त्यांनी विरोधकांवर पलटवार करत, “दररोज खोटं बोलणाऱ्या आणि बाळासाहेबांच्या विचारसरणीला फाटा देणाऱ्यांवर विश्वास ठेवण्याआधी माझं पत्र नीट वाचा,” असे आवाहन केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App