वृत्तसंस्था
मुंबई : महाराष्ट्रातील महाविद्यालये आणि इतर उच्च शिक्षण संस्थांमधील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी CET चे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून ३१ मार्च अखरेची शेवटची तारीख आहे. mht cet 2022 apply for maharashtra joint entrance examination
महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (MHT CET Cell) विविध उच्च शिक्षणातील इंजिनीअरिंग, फार्मसी, कृषी इत्यादी विषयातील अंडर-ग्रॅज्युएट (UG) आणि पोस्ट-ग्रॅज्युएट (PG) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांच्या निवडीसाठी प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येते. महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा २०२२ (MHT CET 2022) साठी नोंदणीची प्रक्रिया १० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ३१ मार्च ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
उमेदवार बारावी (बारावी/समकक्ष परीक्षा) उत्तीर्ण किंवा परीक्षा देत असावा. राखीव प्रवर्गातील उमेदवारांकडे संबंधित वैध प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे. MHT CET २०२२ च्या नोंदणीसाठी उमेदवारांनी त्यांचा अॅक्टीव्ह ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरावा. सीईटी आणि केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया संपेपर्यंत उमेदवाराकडे त्याचा/तिचा ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक अॅक्टीव्ह असणे गरजेचे आहे. उमेदवाराने अंतिम सबमिशन आणि पेमेंट करण्यापूर्वी अर्ज पडताळून पाहणे आवश्यक आहे. सबमिट केलेला अर्ज आणि भरलेले शुल्क परत केले जाणार नाही. त्यामुळे पैसे भरण्यापूर्वी तपशील पडताळून पाहा. प्रमाणपत्रासाठी फोटो, सही यांची चांगली क्वालिटी अपलोड करा.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App