२ वर्षांपूर्वी सहदेवने बचपन का प्यार हे गाणं गायलं होतं. हे गाणं सहदेव गात असताना त्याच्या शिक्षकाने रेकॉर्ड केलं होतं. यानंतर हळूहळू हे गाणं २ वर्षात एवढं हिट झाले की, आज प्रत्येक जण हे गाणं गुणगुणत आहे. MG gift to Sahadeva of ‘Bachpan Ka Pyaar’?
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मागील काही दिवसांत सहदेव आणि त्याच्या गाण्याची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगताना दिसतेय. हे गाणं म्हणजे काही बॉलीवूड किंवा हॉलीवूडचं गाणं नाहीये, तर ते ‘बचपन का प्यार’ हे गाणं आहे. छत्तीसगढच्या सुकमामधील रहिवासी सहदेवने या गाण्यामुळे इंटरनेटवर धमाल उडवून दिली आहे. एका रात्रीत तो सुप्रसिद्ध झाला आहे. आता MG शोरूमने कौतुक करून त्याला २१ हजार रुपयांचा चेक देऊन सन्मानित केले. परंतु सोशल मीडियावर अशी चर्चा रंगली आहे की, त्याला २३ लाखांची कार गिफ्ट करण्यात आली आहे. पण एवढी महागडी कार त्याला मिळालेली नाही. ते वृत्त चुकीचं आहे.
जो व्हिडिओ सध्या व्हयरल होताना दिसत आहे, त्यावरून लोक सहदेवला एमजीने कार गिफ्ट केल्याचं बोलत आहेत. पण MGने हे नाकारले असून यासंबंधी स्पष्टीकरण दिले आहे. एमजीने म्हटले की, आम्ही सहदेवला कोणतीही गाडी गिफ्ट केली नसून त्याला एक चेक देऊन सन्मानित केले आहे. MGने म्हटलं की, जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हयरल होत आहे, त्यामुळे चुकीचा संदेश जातोय.
सोशल मीडियाद्वारे न्यायालयाबाहेर समांतर न्यायालय चालवू नका, सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
बचपन का प्यार हे गाणे आता इंटरनेटवर खूप पसंत केले जात आहे. यावर अनेक रील्स बनवल्या जात आहेत. सहदेवने गायलेल्या गाण्यांवर अनेक सेलिब्रिटींनी व्हिडिओ आणि रील बनवल्या. रॅपर आणि गायक बादशाह ‘बचपन का प्यार’ हे गाणे सहदेवला सोबत घेऊन आणत आहे, ज्याचे शूटिंग संपले आहे. हे गाणे 11 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. या गाण्यात आस्था गिलदेखील आहे.
याआधी बॉलीवूड गायक बादशाहनेही सहदेवशी व्हिडिओ कॉलवर बोलून त्याला भेटण्यासाठी चंदीगडला बोलावले होते. बॉलीवूड कलाकार सहदेवच्या गाण्याचे चाहते बनले, आता छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेलही या गाण्याचे चाहते झाले आहेत. मंगळवारी सीएम बघेल यांनी सहदेव यांची भेट घेतली आणि हे गाणे गायला सांगितले. हा व्हिडिओदेखील सीएम बघेल यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट केला होता. व्हिडिओ शेअर करताना सीएम बघेल यांनी लिहिले, “बचपन का प्यार. वाह!”
बघेल म्हणाले की, सहदेवचे वडील शेतकरी आहेत, त्यांच्या घरी मोबाईल, टीव्ही काहीही नाही. दुसऱ्याच्या मोबाइलवरून गाणे ऐकल्यानंतर त्याने हे गाणे आपल्या शाळेत गायले. आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. ते दिलखुलास जगण्याची गरज आहे. अलीकडेच आपल्या मुलाखतीदरम्यान सहदेवने म्हटले होते की, त्याला मोठे होऊन गायक बनण्याची इच्छा आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App