विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट (दर शंभर चाचण्यांमागे सापडलेले रुग्ण) कमी होत असल्याने निर्बंध शिथिल करणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. मात्र, हे आश्वासन पाळले नसल्याने पुण्यातील व्यापारी आक्रमक झाले आहेत. ३ ऑगस्ट रोजी घंटानाद आंदोलन करण्यात येणार असून सायंकाळी सात वाजेपर्यंत दुकाने सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार व्यापाऱ्यांनी केला आहे. Merchants in Pune are aggressive as Ajit Pawar also cheated, cautioned shops will open till 7 o’clock
पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका म्हणाले, करोना प्रतिबंधात्मक नियम पाळून आज देखील दुकाने सुरू आहेत. यापुढे देखील आम्ही सर्व नियमांचे पालन करून दुकाने सुरू ठेवणार आहोत, मात्र तरीही राज्य सरकार रात्री ७ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देत नाही. याचा निषेधार्थ पुणे व्यापारी महासंघाकडून ३ ऑगस्ट रोजी घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनाची दखल राज्य सरकारने न घेतल्यास, दुसऱ्या दिवशी आम्ही ७ पर्यंत दुकाने सुरू ठेवणार आहे. अशी माहिती रांका म्हणाले, मागील दीड वषार्पासून करोना विषाणूमुळे व्यापारी वर्ग संकटात आला आहे. पुणे शहरात जवळपास ४० हजारांहून अधिक व्यापारी आहेत. ते सर्व आर्थिक संकटात सापडले असून या काळात दोन व्यापाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. अजून किती व्यापाऱ्यांची आत्महत्या होण्याची वाट हे सरकार पाहणार आहे? या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत अनेक वेळा चर्चा झाली. ते केवळ म्हणतात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, आता आम्ही काय करायचं?
शहरातील व्यापारी वर्गाचा वाढता दबाव लक्षात घेता, आम्ही ३ ऑ गस्ट रोजी दुपारी १२ ते १२.१५ पर्यंत शहरातील ठिकठिकाणी घंटानाद आंदोलन करणार आहोत. या आंदोलनाची दखल राज्य सरकारने संध्याकाळ पर्यंत न घेतल्यास दुसऱ्या दिवसापासून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवणार आहोत, आम्ही आता कारवाईला घाबरणार नाही. कारवाईला सामोरे जाण्यास तयार आहोत. याचबरोबर, शनिवार आणि रविवारीचे नियम पाळणार असल्याचे रांका यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App