विशेष प्रतिनिधी
मुंबई : Jitendra Awhad मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत विविध पदांवर नवीन चेहऱ्यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नवीन शेट्टी यांचा 48 मतांनी पराभव करून विजय मिळवला. तर, सचिव पदासाठी उन्मेष खानविलकर यांनी शाह आलम शेख यांचा पराभव करत बाजी मारली. संयुक्त सचिव म्हणून निलेश भोसले यांची निवड झाली, त्यांनी गौरव पय्याडे यांना पराभूत केले. दरम्यान, एमसीएच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची याआधीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या संपूर्ण निवडणुकीसाठी एकूण 362 जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता.Jitendra Awhad
मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) च्या निवडणुकीत विविध पदांवर झालेले महत्त्वाचे निकाल: उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड (203 मते) यांनी नवीन शेट्टी (155 मते) यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. सचिव पदावर उन्मेष खानविलकर (227 मते) यांनी शाह आलम शेख (129 मते) यांना मोठ्या फरकाने हरवले. संयुक्त सचिवपदासाठी निलेश भोसले (228 मते) यांनी गौरव पय्याडे (128 मते) यांचा पराभव केला, तर खजिनदारपदावर अरमान मलिक (237 मते) यांनी सुरेंद्र शेवाळे (119 मते) यांच्यावर विजय मिळवला.Jitendra Awhad
ॲपेक्स कौन्सिल (9 विजयी उमेदवार आणि मते)
कदम विघ्नेश- 242 नदीम मेमन- 198 मिलिंद नार्वेकर- 242 भूषण पाटील- 208 विकास रेपाळे- 185 सूरज समत- 246 सावंत नील- 178 संदीप विचारे- 247 प्रमोद यादव- 186 मतभेद वाढल्याने पुन्हा निवडणूक घ्यावी लागली
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी यापूर्वीच अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाली होती. यानंतर उर्वरित कार्यकारिणी पदांसाठी शरद पवार आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्यात बैठक झाली आणि काही नावांवर एकमत झाले होते. मात्र, रात्री उशिरा काही अनपेक्षित घडामोडी घडल्या. अजिंक्य नाईक यांनी लावलेल्या अभिनंदनाच्या होर्डिंग्जवर आशिष शेलार गटाला अपेक्षित असलेल्या काही उमेदवारांची नावे नव्हती. यामुळे नाराजी निर्माण झाली आणि मतभेद वाढल्याने समझोता होऊ शकला नाही, परिणामी उर्वरित पदांसाठी पुन्हा निवडणूक घ्यावी लागली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App