शिर्डीत साई भक्तांसाठी पुन्हा मास्कसक्ती; मंदिर प्रशासनाने जारी केले नवे नियम

प्रतिनिधी

मुंबई : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रार्दूभाव वाढल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने भारतात अलर्ट जारी झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता जगभरात विशेष उपाययोजना करण्यात येत आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात टास्क फोर्स गठीत करणार असल्याची माहिती दिली आहे. Mask again for Sai devotees in Shirdi

या दृष्टीने आता शिर्डीतल्या साईबाबा संस्थानाने सुद्धा सतर्कतेचे उपाय सुरू केले आहेत. साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी साईबाबा संस्थानने विशेष नियमावली जारी केली आहे.



साई भक्तांसाठी नियम

  • दर्शनाला आलेल्या साई भक्तांनी मास्कचा वापर करावा.
  • सोशल डिस्टनसिंगसह सॅनिटायझरचा वापर करावा.
  • ज्यांनी बूस्टर डोस घेतले नसतील त्यांनी त्वरीत घ्यावेत.
  • कोविडचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी काळजी घ्यावी.
  • साई संस्थाने प्रभारी कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी हे आवाहन केले आहे. त्यामुळे आता शिर्डीला दर्शनाला जाणाऱ्या भाविकांना पुन्हा एकदा मास्कसक्ती करण्यात आली आहे.

Mask again for Sai devotees in Shirdi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात