विशेष प्रतिनिधी
पुणे : Tamhini Ghat लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसला ताम्हिणी घाटातील अवघड वळणावर अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू झाला तर 27 जण जखमी झाले.Tamhini Ghat
माणगाव पोलीस स्टेशन हद्दीत ताम्हीणी घाटात परपल ट्रॅव्हल्सची खाजगी बस पलटी झाली. जाधव कुटुंबीय लोहगाव पुणे येथून बिरवाडी महाड येथे लग्न समारंभास जात असताना ताम्हीणी घाटातील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली. यामधे २ पुरुष व ३ महिला अशा एकूण ५ जणांचा मृत्यू झाला आहे. २७ जखमी लोकांना बाहेर काढून माणगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. बचाव पथक आणि पोलिस घटनास्थळी काम करत आहेत.
संगिता धनंजय जाधव, गौरव अशोक दराडे, शिल्पा प्रदिप पवार, वंदना जाधव यांच्यासह एका अनोळखी पुरुषाचा अपघातात मृत्यू झाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App