विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : Chhatrapati Sambhajinagar बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेल्या विहार आणि विपश्यना केंद्राला ५५ वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे. या वास्तूचे बांधकाम डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जागेवर नाही. तरीसुद्धा ही वास्तू अतिक्रमित असल्याचे सांगत नोटीस दिली. हा प्रकार सावरण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी १२ धार्मिक स्थळे नियमित करण्यासाठी निर्देश दिले. परंतु नोटिसीमुळे भावना दुखावल्याने भिक्खू संघ, उपासक व आंबेडकरी समुदायातर्फे सोमवारी सकाळी ११ वाजता क्रांती चौक ते विभागीय आयुक्तालयापर्यंत ‘एल्गार मोर्चा’ काढण्यात येईल, अशी माहिती समन्वयक गौतम खरात यांनी दिली. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शहरातील शाळांना सोमवारी सुटी जाहीर केली आहे.Chhatrapati Sambhajinagar
औरंगाबाद खंडपीठातील याचिकेच्या अनुषंगाने विद्यापीठाने सर्वेक्षण समिती नेमली होती. त्यानुसार विद्यापीठ परिसरातील १२ धार्मिक स्थळे काढण्याचा निर्णय घेण्यात आला. बेगमपुरा पोलिस ठाण्याने संबंधितांना नोटीस बजावली आहे. पण आंबेडकरी समुदायाने बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेले बुद्धविहार काढण्यास विरोध केला. बुद्धविहार विद्यापीठाच्या जागेवर नसून गावठाणमध्ये आहे. त्याचे ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र आहे. या लेणीच्या पायथ्याशी लाखो लोक विपश्यना करण्यासाठी येतात. त्याचबरोबर धम्मचक्क अनुप्रवर्तन दिनी लाखो लोकांची गर्दी असते. त्यामुळे पोलिस नोटीसीच्या निषेधार्थ शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून विभागीय आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देण्याचा निर्धार करण्यात आला आहे. क्रांती चौक-पैठण गेट-गुलमंडी-सिटीचौक- शहागंज- फाजलपुरामार्गे अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ माेर्चाचे सभेत रुपांतर होईल. दहा दिवसांपासून आंबेडकरी कार्यकर्ते मोर्चाची तयारी करत आहेत. ‘धम्मभूमी के सन्मान मे भीमसैनिक मैदान मे’ हा नारा सोशल मीडियावर दिला जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App