नाशिक : उद्धव ठाकरे यांचे सरकार विश्वास दर्शक ठराव मंजूर करून घेण्याआधीच पायउतार झाल्यानंतर मराठी माध्यमांनी उतावीळपणे देवेंद्र फडणवीस यांचे मंत्रिमंडळ “ठरवून” टाकले आहे आणि त्यातून पंकजा मुंडे यांना “वगळून”ही टाकले आहे!! Marathi media speculates Fadanavis-shinde ministry, drops Pankaja munde themselves
देवेंद्र फडणवीस यांचे सरकार महाराष्ट्रात येणार त्यांच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री म्हणून स्थान मिळणार वगैरे बातम्या मराठी माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने आधीच दिल्या आहेत. पण त्या पलिकडे जाऊन फडणवीस यांचे अख्खे मंत्रिमंडळच माध्यमांनी “ठरवून” टाकले आहे फडणवीसांच्या मंत्रिमंडळात जी सहज सुचू शकतात, ती चंद्रकांतदादा पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार ही नावे तर माध्यमांनी दिली आहेतच, पण या खेरीज राम शिंदे, गोपीचंद पडळकर ही नावेही माध्यमांनी आवर्जून दिली आहेत.
– माध्यमांचा आवडता खेळ
या पलिकडचा आवडता खेळ माध्यमांनी बातम्यांमध्ये रंगवला आहे. पंकजा मुंडे यांना फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार नसल्याची बातमी माध्यमांनी परस्पर दिली आहे. आधी माध्यमांनी त्यांच्या विधान परिषदेच्या उमेदवारीवरून जोरदार राजकीय पतंग उडवले. विधान परिषदेची उमेदवारी त्यांनी “स्वतः मागितली” अशा बातम्या माध्यमांनी दिल्या आणि त्यांना उमेदवारी “भाजपने नाकारली”, अशा बातम्या स्वतःच्याच सूत्रांच्या हवाल्याने देऊन टाकल्या. जणू काही भाजप माध्यम आधारित राजकारण करतो असा माध्यमांनी स्वतःचा समज करून घेतला आहे.
– माध्यमांचा समज
आताही फडणवीसांचे मंत्रिमंडळ “ठरवून” आणि त्यातून पंकजा मुंडे यांना “वगळून” माध्यमांनी परत एकदा आपणच म्हणजे माध्यमिक महाराष्ट्राचे राजकारण “चालवतात” असा स्वतःचा समज करून घेतला आहे!!
– वाटाघाटी सुरू
वास्तविक नव्या मंत्रिमंडळात बाबत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या वाटाघाटी व्हायच्या आहेत. त्याचे सार निघायचे आहे. सूत्र ठरायचे आहे. पण माध्यमांनी “स्वबुद्धी”ने मंत्रिमंडळ वाटपाचे सूत्र ठरवून खातेवाटपही करून टाकले आहे!! जणू काही फडणवीस आणि शिंदे हे आपल्या मंत्रिमंडळाचे खाते वाटप मंत्रालयात बसून न करता प्रसारमाध्यमांच्या कार्यालयात बसून करणार आहेत!!, असा माध्यमांनी समज करून दिला आहे.
– शिंदे गटातील नावेही “ठरवली”
एकनाथ शिंदे यांच्या गटातली नाव देखील माध्यमांनी स्वतःहून “ठरवून” टाकली आहेत. उदय सामंत, दीपक केसरकर शहाजी बापू पाटील वगैरे नावांवर माध्यमांनी स्वतःचे “शिक्कामोर्तब” केले आहे. त्यामुळे फडणवीस – शिंदे मंत्रिमंडळ अस्तित्वात आले आणि ते कारभार पाहू लागले एवढेच माध्यमांनी लिहायचे आणि सांगायचे बाकी ठेवले आहे!! उरलेले सगळे माध्यमांनी “ठरवून”च टाकले आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App