असूनही 105, शोधतात “नाथ”; कोणी 30 – 40 आमदारांचा गट घेऊन येणार मुख्यमंत्री होणार; मराठी मीडिया कुणासाठी चालवतोय नॅरेटिव्ह??

विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोणी 30 – 40 आमदारांचा गट घेऊन येणार आणि मुख्यमंत्री होणार, मग 115 आमदारांचा पक्ष काय गोट्या खेळत बसणार का??, मराठी मीडिया नेमका कुणासाठी काय नॅरेटिव्ह चालवतो आहे??, त्यांचे “सोर्सेस” नेमके काय आहेत हे तपासण्याची गरज आहे. खरं म्हणजे असूनही 105 शोधतात “नाथ”, असा हा नॅरेटिव्ह आहे!! Marathi media exaggerated ajit Pawar’s rebellion, setting pro Pawar narrative

शिवसेना फोडून एकनाथ शिंदे 40 आमदार घेऊन आले आणि ते मुख्यमंत्री झाले. म्हणजे भाजपने त्यांना मुख्यमंत्री बनविले. भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांना स्वतःच्या काही कॅल्क्युलेशन्स नुसार दुय्यम भूमिका घेणे भाग पाडले. केंद्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या विशिष्ट राजकारणाची गरज आणि त्यातला एक भाग म्हणून हे नॅरेटिव्ह समजू शकते. पण म्हणून आता नऊ महिन्यांतच एकनाथ शिंदे हे भाजपसाठी “ॲसेट” उरले नसून ते “लायबिलिटी” झाले आहेत आणि म्हणून अजित पवार 40 आमदार घेऊन येणार आणि लगेच मुख्यमंत्री होणार, असा नॅरेटिव्ह मराठी मीडिया चालवतो आहे. पण या नॅरेटिव्ह मागचा मराठी मीडियाचा नेमका “सोर्स” कोणता?? तो कशासाठी चालवला जात आहे??

जणू काही पवारच राजकारण करतात

यातले “बिटवीन द लाईन्स” वाचल्यानंतर हा सरळ – सरळ “पवार अनुकूल नॅरेटिव्ह” आहे. राष्ट्रवादी म्हणजे सत्ता आणि सत्ता म्हणजे राष्ट्रवादी हे समीकरण महाराष्ट्राच्या डोक्यात पक्के भिनवायचा हा नॅरेटिव्ह आहे. जे काही राजकारण करतात, ते फक्त शरद पवारच करतात आणि बाकीचे त्यांच्याभोवती खेळत राहतात, अशी चतुराईने पेरणी करणारा हा नॅरेटिव्ह आहे. 303 खासदार निवडून आणणारे नरेंद्र मोदींचे नेतृत्व 5 खासदार निवडून आणणाऱ्या शरद पवारांभोवती फिरते आहे, एवढेच स्पष्ट फक्त आता मराठी मीडियाने लिहायचे किंवा सांगायचे राहिले आहे!! बाकी सूचक पद्धतीने हेच मराठी मीडिया सांगतो आणि लिहितो आहे!!


Ajit Pawar : लोकांना फुकट पाणी आणि वीज आवडते, पण त्यात सगळा महसूल खर्च होतो; अजित पवारांचे वक्तव्य!!


एकनाथ शिंदे 40 आमदार घेऊन आले आणि ते मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्राला मराठा मुख्यमंत्री देण्यासाठी भाजपने तो डाव खेळला गेलाय खेळल्याचे बोलले गेले. जणू काही महाराष्ट्रात मराठा मुख्यमंत्री द्यायचा असेल, तर भाजपमध्ये एकही मराठा आमदार शिल्लकच नव्हता असा मराठी मीडियाचा दावा आहे. त्यासाठी अधून मधून विनोद तावडे किंवा आशिष शेलार यांचे नाव पुढे केले जाते. पण भाजपच्या केंद्रीय नेतृत्व मान्य नाही, असे परस्पर ठरवून मराठी मिडीयम मोकळा होतो. आपल्या “पवार अनुकूल नॅरेटिव्ह”साठी जो जो युक्तिवाद जो बौद्धिक वाटेल तो सर्व करण्याची मराठी मीडियाची तयारी आहे आणि तेच सध्याच्या अजितदादा 40 आमदार घेऊन येणार आणि मुख्यमंत्री होणार या नॅरेटिव्ह मधून दिसत आहे!! यासाठी भाजप मधल्या कुठल्याही सोर्सेसचा वापर होत नाही किंबहुना भाजपचे जे खरे निर्णय घेणारे वर्तुळ आहे, तिथे तर मराठी मीडियाची पोहोचच नाही. त्यामुळे तिथे “सोर्स” निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

असूनी 105 शोधताहेत “नाथ”

मग उरतात ते “दुय्यम सोर्सेस”. त्यावर आधारित मराठी मीडियाचा अजितदादांच्या कथित बंडाच्या बातम्या देत आहे. भाजपने विधानसभेच्या सलग दोन निवडणुकांमध्ये शंभरी गाठली. त्यांना बहुमताचा आकडा पार करता आला नाही. त्यामुळे भाजप नेतृत्व बाहेरच्या पक्षांमध्ये नेतृत्व शोधत आहे, असा जावईशोध मराठी मीडियाने लावला आहे. जणू काही भाजप अधिक 124 आणि आता 105 आमदार निवडून आणल्यानंतर राजकीय दृष्ट्या “अनाथ” झाला आहे आणि तो आपला “नाथ” बाहेर शोधत आहे आणि तो “नाथ” पवारांच्या रूपाने पुढे आला आहे, असा मराठी मीडियाचा जावईशोध आहे. यातला “सोर्स” देखील भाजपमध्ये खरे निर्णय घेणारा घटक नाही, तर तो थेट राष्ट्रवादीशी संबंधित आहे.

सत्तेत पतरण्याची राष्ट्रवादीला घाई

ठाकरे – पवार सरकार गेल्यानंतर आपला सत्तेतला मोठा वाटा गेला. त्यामुळे राष्ट्रवादीला कसेही करून 9 महिन्यांनंतर सत्तेत परतायचे आहे. त्यासाठी वाट्टेल तो आटापिटा करण्याची आणि उलट सुलट उड्या मारण्याची त्यांची तयारी आहे. पण हे उघड सांगता येत नाही आणि बोलता येत नाही. त्यासाठी काही बौद्धिक राजकीय मुलामा लावावा लागतो. तसा मुलामा सध्या लावणे सध्या चालू आहे आणि 40 आमदारांच्या बळावर अजितदादा येणार आणि मुख्यमंत्री होणार असा नॅरेटिव्ह चालवला जात आहे!!

Marathi media exaggerated ajit Pawar’s rebellion, setting pro Pawar narrative

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub