जर तुम्ही तशाच पद्धतीने वागला असाल किंवा उघडपणे तुम्ही त्या वागण्याला समर्थन देत असाल, तर द केरळ स्टोरीवर तुम्हाला बंदी घालावी लागेल.

अभिनेत्री राधिका देशपांडे हिचे ‘द फोकस इंडियाच्या गप्पाष्टक ‘ या कार्यक्रमात खडे बोल.

विशेष प्रतिनिधी

पुणे : मराठी मनोरंजन विश्वात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री राधिका देशपांडे नुकतीच’ द फोकस इंडियाच्या गप्पाष्टक ‘या कार्यक्रमात आली होती . या मुलाखती पर कार्यक्रमात राधिका ने अनेक प्रश्नांना स्पष्ट,सडेतोड आणि प्रामाणिक अशी उत्तरे दिली. Marathi actress Radhika Deshpande interview. Har opinion about the Kerala story ban

” तुम्ही त्याच पद्धतीने वागला असाल, किंवा उघडपणे त्याचं गोष्टीच समर्थन करत असाल. तर तुम्हाला ‘द केरळ स्टोरी ‘ सारख्या सिनेमावर बंदी घालावीच लागेल . कारण तो सिनेमा इतक उघडपणे प्रामाणिक पणे सत्य मांडतो . की त्यामुळे त्या सत्याचा त्या वास्तव्याचा त्रास काही राज्यांना नक्कीच होऊ शकतो.. मात्र सत्य दाबण्यासाठी अशा कलाकृतींवर बंदी घालण एक कलाकार म्हणून प्रचंड दुर्दैवी वाटतं. आणि आतून खूप त्रास होतो. अशा परखड शब्दात राधिकाने आपलं मतं व्यक्त केलं.

याच प्रश्नाला पुढे उत्तर देताना राधिका म्हणाली. ‘द केरळ स्टोरी यासारखा सिनेमा आपल्याला का बघावा लागतोय. तशी परिस्थिती आपल्यावर का आली आहे याचा विचार आपण सगळ्यांनी करायला हवा. त्याच्या गाभ्यात आपण शिरायला हवं. आणि हा सगळा विचार करायला लावणाराचं हा सिनेमा आहे.

आपल्या मुलींना आपण जपायला हवं. आपल्या संस्कृतीच आपल्या धर्माचे शिक्षण त्याचं बाळकडू लहानपणापासून आपल्या मुलींपर्यंत आपण पोहोचवायला हवं असं मंत राधिकानं व्यक्त केलं.
या कार्यक्रमात राधिकानं तिच्या बालरंगभूमीवरील कामाबद्दल, तिच्या अभिनयाबद्दल तिच्या लेखन प्रवासा बद्दल , अशा अनेक प्रश्नांना मनमोकळी आणि परखड अशी उत्तर दिली.
द फोकस इंडियाच्या गप्पाष्टक या कार्यक्रमात घेतलेली राधिका देशपांडे हिची संपूर्ण मुलाखत आपण ‘द फोकस इंडिया च्या यूट्यूब चॅनल वर सविस्तर बघू शकतो.

Marathi actress Radhika Deshpande interview. Har opinion about the Kerala story ban

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात