वारीच्या महासोहळ्यात कलाकार रंगले तुकोबा ज्ञानोबाच्या जय घोषात..

झी मराठी वरील कलाकार वैष्णवांच्या मेळ्यात..


विशेष प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्राला पंढरपूरच्या वारीची हजारो वर्षाची परंपरा आहे. वारीच्या या महासोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक वारकरी प्रत्येक व्यक्ती हा भक्ती रसात न्हाहूनं निघतो. ज्ञानोबा तुकोबाच्या जय घोषात अवघा असमंत ढवळून निघतो Marathi actors participated in Wari.

वारीच्या या दिवसात प्रत्येक वारकऱ्याला आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटण्याचे वेधलागतात आणि मग पावलं आपोआपचं पंढरीच्या दिशेने चालू पडतात. आणि मग अवघारंग एक होतोआणि या भक्तीरसाची भुरळ भल्याभल्यांना पडते मग याला कलाकार तरी कसे अपवाद राहतील



संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्या नुकत्याच सासवड कडे मार्गस्थ झाल्या. या पालख्या पुणे मुक्कामी असताना झी मराठी या वाहिनी वरील कलाकार जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीत सहभागी झाले.. कपाळावर वैष्णवांचा टिळा आणि मुखी हरिनामाचा घोष करत,फुगडी घालत या कलाकारांनी वारीचा आनंद लुटला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Dhamaal (@marathidhamaal)

विठ्ठला चरणी सेवा म्हणून या कलाकारांनी वारीतील वारकऱ्याच्या पंक्तीत जेवण वाढलं. हरिपाठ म्हणत फुगड्या घालत हे कलाकार हरिनामात तल्लीन झाले होते

वारी पाहणं वारी अनुभवणं हा एक दिव्य अनुभव असतो. हा अनुभव झी मराठी वरील करांनी याची देही याची डोळा अनुभवला. यामध्ये झी मराठीवरील विविध मालिकेतील कलाकार सहभागी झाले होते.

यामध्ये अभिनेत्री अनुष्का सरकटे, शिवानी नाईक या दोघींनी तुळस डोक्यावर घेत वारीची वाट चालली ..अभिनेता आदित्य वैद्य, आयुष संजीव, ऋषिकेश शेलार, या कलाकारांनी वारकऱ्यांची पंगत वाढली. वारी मधील प्रत्येक चालणारा वारकरी हा माऊली म्हणून संबोधला जातो. त्यामुळे वारीतल्या प्रत्येकाची सेवा करणं ही जणू विठ्ठलाची सेवा करण्यासारखं असतं. त्यामुळे वारीतल्या प्रत्येकाची सेवा करण्याचा अनेक जण प्रयत्न करत असतात.

हा एक महाराष्ट्राला लाभलेला समृद्ध वारसा आहे. तू वारसा जपण्याचं काम या कलाकार मंडळीने केलं.

Marathi actors participated in Wari…

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात