Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी झालेल्या मूक आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने 17 जून रोजी बैठक घेतली होती. या बैठकीत समाजाच्या मागण्या शासन स्तरावर मान्य करण्यात आल्या. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रशासनाने वेळ मागितला होता. परंतु महिना उलटूनही काहीही कार्यवाही झाली नाही. यामुळे भाजपचे राज्यसभा खासदार संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपसमितीच्या सदस्य मंत्र्यांना पत्र लिहून पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. Maratha Reservation MP Sambhaji Chhatrapati Writes CM Uddhav Thackeray Warns To Start Agitation Again
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी झालेल्या मूक आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने 17 जून रोजी बैठक घेतली होती. या बैठकीत समाजाच्या मागण्या शासन स्तरावर मान्य करण्यात आल्या. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रशासनाने वेळ मागितला होता. परंतु महिना उलटूनही काहीही कार्यवाही झाली नाही. यामुळे भाजपचे राज्यसभा खासदार संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपसमितीच्या सदस्य मंत्र्यांना पत्र लिहून पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे.
मात्र एक महिना पूर्ण होऊनदेखील प्रशासनाने कार्यवाही केलेली नाही. याबाबत मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री व उपसमितीच्या सदस्य मंत्रीगणांस पत्र लिहिले…. (२/२)@CMOMaharashtra @OfficeofUT @AjitPawarSpeaks @AshokChavanINC @bb_thorat @Dwalsepatil — Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) July 15, 2021
मात्र एक महिना पूर्ण होऊनदेखील प्रशासनाने कार्यवाही केलेली नाही. याबाबत मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री व उपसमितीच्या सदस्य मंत्रीगणांस पत्र लिहिले….
(२/२)@CMOMaharashtra @OfficeofUT @AjitPawarSpeaks @AshokChavanINC @bb_thorat @Dwalsepatil
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) July 15, 2021
महोदय,
मा. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे शैक्षणिक व शासकीय नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजास शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या काही मागण्या समाजामार्फत आम्ही राज्य शासनाकडे मांडल्या होत्या. आरक्षणाइतक्याच या मागण्या महत्त्वपूर्ण असून या मागण्यांच्या पूर्ततेनंतर मराठा समाजाच्या सर्वांगीण उन्नतीस हातभारच लागणार आहे. या मागण्या पूर्ण करण्यासाठी समाजास वेठीस न धरता थेट लोकप्रतिनिधींची भूमिका जाणून घेण्यासाठी आम्ही मूक आंदोलनाचा पर्याय निवडला. दि. 16 जून रोजी कोल्हापूर येथे झालेल्या मूक आंदोलनानंतर राज्य शासनाने आम्हाला मागण्यांबाबत निर्णय घेण्यासाठी बैठकीस निमंत्रित केले. दि. 17 जून रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व सदस्य मंत्रीगण, राज्याचे महाधिवक्ता यांचेसह राज्यातील प्रमुख समन्वयक व संबंधित सर्व शासकीय विभागांचे मुख्य सचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत समाजाच्या प्रमुख मागण्यांविषयी सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री व उपस्थित मंत्रीगणांनी समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दर्शविला असता, उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यानुसार कार्यवाही करून मागण्यांची पूर्तता करणेबाबत आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करणेसाठी कालावधी मागितला होता. याबाबत राज्य शासनाचे वतीने करण्यात आलेल्या विनंतीनुसार आम्ही नियोजित मूक आंदोलन एक महिना पुढे ढकलले होते. हा एक महिन्याचा अवधी संपत आला असून राज्य शासनाने बैठकीत घेतलेल्या निर्णयांची पूर्तता व अंमलबजावणी करणेसाठी प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही. राज्य शासनाने समाजाच्या बहुतांश मागण्या मान्य जरी केल्या असल्या, तरी प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे यावर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. तरी, मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे मा. अध्यक्ष व सदस्य मंत्रीगण यांनी या सर्व परिस्थितीचा गांभिर्याने विचार करून, संबंधित सर्व प्रशासकीय विभागांकडून मागण्यांबाबत झालेल्या निर्णयांचा कार्य अहवाल त्वरीत मागवून या मागण्या मार्गी लावून त्यांची तात्काळ प्रभावी अंमलबजावणी करावी, अन्यथा आमचा लढा आम्ही पुन्हा सुरू करू.
कळावे, (संभाजी छत्रपती)
Maratha Reservation MP Sambhaji Chhatrapati Writes CM Uddhav Thackeray Warns To Start Agitation Again
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App