वृत्तसंस्था
मुंबई : Maratha reservation मराठा अरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिल आहे. या प्रकरणाची सुनावणी आता पुन्हा नव्याने सुरू होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुरुवातीपासून पुन्हा सुनावणी होणार आहे.Maratha reservation
या संदर्भातील याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे नवनियुक्त मुख्य न्यायमूर्तींना विनंती केली होती. याच सोबत नवीन विशेष पूर्णपीठ स्थापन करण्याचे देखील उच्च न्यायालयाकडे विनंती केली होती. याचिकाकर्त्यांच्या या विनंतीला मुख्य न्यायमूर्तींनी मान्यता दिली आहे. त्यामुळे मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली पूर्णपीठ नव्याने सुनावणी घेण्यास तयार झाले आहे. तसेच याचिकाकर्त्यांना याबाबत रजिस्ट्रारकडे नव्यानं अर्ज करण्याचे ही कोर्टाने निर्देश दिले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने घेतलेल्या या निर्णयाने मराठा आरक्षणाची सुनावणी आता लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पूर्वीचे मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली न्यायालयात या प्रकरणी सुरू असलेली सुनावणी जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर होती. या प्रकरणाची सुनावणी जवळपास 60 टक्के पूर्ण झाली होती. मात्र, आता पुन्हा नव्याने सुनावणी होणार असल्याने ही सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांची मुंबई उच्च न्यायालयात बदली झाल्यामुळे ही सुनावणी पुन्हा नव्याने नव्या न्यायपिठापुढे होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे हा कालावधी कुठेतरी ग्राह्य धरला जाईल. मुळे दोन्ही बाजूच्या सरकारी वकील आणि याचिकाकर्त्यांना नव्याने आपले म्हणणे मांडावे लागेल. त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय येण्यास आणखी काही महिने लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App