Chagan Bhujbal : मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही, त्यांना वेगळे आरक्षण द्या; छगन भुजबळ यांची मागणी

Chagan Bhujbal

विशेष प्रतिनिधी

नाशिक : Chagan Bhujbal राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सोमवारी पत्रकार परिषद घेत त्यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण नको, अशी मागणी केली आहे. तसेच आज पुन्हा एकदा त्यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नसल्याचे म्हटले आहे.Chagan Bhujbal

छगन भुजबळ म्हणाले, सगळ्या आयोगांनी मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही. हा समाज जो आहे हा आर्थिकदृश्य मागास असेल, शैक्षणिकदृष्ट्या असेल, परंतु हा समाज सामाजिक मागासलेला नाही असे सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने सांगितले आहे.Chagan Bhujbal



महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री झाले आहेत ज्यांनी मराठा समाजाला मागास मानेल नाही. सारथीच्या माध्यमातून जे ओबीसीला मिळते ते तर दिलेच, त्यापेक्षा अधिक देणे सुरू आहे. वसतीगृहसाठी फुकट दिले आहे. परंतु, ओबीसीला अजूनही लढावे लागत आहे. त्यांना वर्षाला 60 हजार रुपये दिले जातात. आम्हाला अजूनही मागावे लागत आहे.

कालेलकर आयोगाने मराठा समाज पुढारलेला असल्याचे म्हटले

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देता येणार नाही, याचे कारण असे आहे की कालेलकर आयोग जे आहे, 1960 च्या दरम्यान निर्माण झाले होते. त्यांनी मराठा समाजाला पुढारलेला समाज असल्याचे सांगितले होते. त्यानंतर मंडल आयोगाने सांगितले की हा समाज पुढारलेला आहे. त्यानंतर मग मंडल आयोग सगळीकडे लागू झाल्यानंतर 1993 च्या आधी आयोग ही कल्पना नव्हती. त्यावेळी विधानसभेत निर्णय घेतले जायचे. 93 साली इंद्रा सहाणी केस जेव्हा झाली तेव्हा निर्णय घेण्यात आला की आयोग स्थापन केले जाईल.

मंडल आयोग हा केंद्र सरकारनेच तयार केला असल्याने 27 टक्के आरक्षण ओबीसीला दिले. त्यानंतर महाराष्ट्रात देशमुख आयोग, बापट आयोग, खत्री आयोग आणि गायकवाड आयोग, यातील गायकवाड आयोग सोडल्यास इतर आयोगांनी निर्णय दिले की मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागास नाही.

Marathas Not Socially Backward Chagan Bhujbal Demands Separate Reservation

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात