वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्र सरकारने अनेक राज्यपालांच्या बदल्या केल्या असून काही राज्यपालांचे राजीनामे देखील राष्ट्रपती द्रौपदी म्हणून मंजूर केले आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवृत्त होण्याचा मनोदय बोलून दाखवल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले असून भगतसिंह कोशियारी यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला आहे. त्यांच्या जागी रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. Many governors changed; Bhagat Singh Koshyari’s resignation accepted; Ramesh Bais is the new Governor of Maharashtra
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले – सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भात भगतसिंग कोशियारी यांची अनेक वक्तव्ये वादग्रस्त ठरली होती किंवा ठरवली गेली होती. त्यावरून महाराष्ट्रातल्या काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट या तिन्ही पक्षांनी राज्यपालांविरुद्ध तक्रारी करून रान उठवले होते. महाविकास आघाडीने राज्यपाल आणि विरुद्ध मुंबई मोर्चा देखील काढला होता. मात्र त्या मोर्चाला फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याची छायाचित्रे सोशल मीडियात व्हायरल झाली होती.
भगतसिंग कोशियारी राज्यपालपदी असताना त्यांचे आणि महाविकास आघाडी सरकारचे फारसे राजकीय सख्य राहिले नव्हते. महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारने शिफारस केलेल्या 12 आमदारांची नियुक्ती भगतसिंह कोशियारी यांनी अखेरपर्यंत विधान परिषदेवर केली नव्हती. याचा राग महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मनात कायम राहिला होता. त्यातूनच राज्यपालांविरुद्ध वेगवेगळ्या कारणाने रान पेटवण्याची संधी महाविकास आघाडीतल्या पक्षाच्या नेत्यांनी घेतली होती. भगतसिंह कोशियारी यांना थेट हेलिकॉप्टर मधून उतरवण्याची खेळी देखील ठाकरे – पवार सरकारने केली करून पाहिली होती. पण तरी देखील भगतसिंग कोशियारी यांनी महाविकास आघाडी सरकारने शिफारस केलेल्या 12 आमदारांची नियुक्ती विधान परिषदेवर केली नव्हती. महाविकास आघाडी आणि भगतसिंग कोशियारी यांच्यातला हा राजकीय संघर्ष अखेरपर्यंत कायम राहिला होता.
या पार्श्वभूमीवर स्वतः भगतसिंग कोशियारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपल्या निवृत्तीचा मनोदय बोलून दाखवून पत्र पाठवले होते. आज त्यांचं राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा मंजूर करून त्यांच्या निवृत्तीचा मार्ग मोकळा केला आहे.
निवृत्ती न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर यांना आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्त केले आहे. आंध्र प्रदेशचे राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांना छत्तीसगडच्या राज्यपालपदी, तर छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसूया उईके यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
लडाखचे उपराज्यपाल राधाकृष्ण माथुर यांचा राजीनामा ही राष्ट्रपतींनी मंजूर केला असून अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ब्रिगेडियर डॉ. बी. डी. मिश्रा यांची लडाखच्या उपराज्यपालपदी नियुक्ती केली आहे.
लेखन जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक यांना अरुणाचल प्रदेशच्या राज्यपालपदी तर लक्ष्मण प्रसाद आचार्य यांना सिक्कीमच्या राज्यपालपदाची नियुक्ती मिळाली आहे. राजस्थान मधले प्रभावी नेते गुलाबचंद कटारिया यांना आसामच्या राज्यपाल पदाची तर सीपी राधाकृष्णन यांना झारखंडच्या राज्यपाल पदाची जबाबदारी मिळाली आहे. शिव प्रताप शुक्ला यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपाल पदी नियुक्ती केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App