प्रतिनिधी
नागपूर : शिवसेना उबाठाचे नेते एल्विश यादवच्या अटकेवरून निराशेतून मुख्यमंत्र्यांवर टीका करीत आहेत. जुन्या गोष्टी काढायच्या म्हटल्या, तर विरोधकांपैकी अनेक नेते अडचणीत येतील, असा स्पष्ट इशारा देत देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल केला.Many are in trouble if the opponents’ old accounts are settled; Fadnavis attacks on Elvish Yadav’s arrest
लोकप्रिय युट्युबर आणि बिग बॉस फेम एल्व्हिश यादव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हे प्रकरण रेव्ह पार्ट्यांमध्ये विषारी नागाच्या विषाच्या बेकायदेशीर पुरवठ्याशी संबंधित आहे. या नागाचे विष रेव्ह पार्ट्यांमध्ये मादक पदार्थांसाठी वापरले जाते. या मुद्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
या प्रकरणी नोएडा पोलिसांनी वनविभागासह 2 नोव्हेंबर रोजी छापा टाकला होता, या छाप्यात 9 सापांसह 5 जणांना अटक करण्यात आली होती. 9 सापांपैकी 5 नाग होते, जे अत्यंत विषारी आहेत. या छाप्यावेळी एक घोडा आणि बिबट्यादेखील जप्त करण्यात आला आहे. याशिवाय आरोपींकडून सापाचे 20 मिली विषही सापडले. आरोपींची चौकशी केली असता, दिल्ली-एन. सी. आर. मधील रेव पार्ट्यांमध्ये नागाचे विष अंमली पदार्थ बनविण्यासाठी (Drugs) वापरले जात असल्याची माहिती उघड झाली.
भाजपा नेत्या मनेका गांधी यांच्या स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, एल्व्हिश यादवने या प्रकरणात राहुल नावाच्या व्यक्तीचा नंबर दिला होता.
– उपमुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल
या प्रकरणाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र ट्रक्समुक्त करण्यासाठी सरकार कठोर कारवाई करते आहे. ड्रग्स विरोधातील लढाई दीर्घकाळ चालणार आहे. ड्रग्स विरोधी कायद्यातील कठोरातील कठोर कलमे लावून दोषींवर कारवाई करण्यात येईल. ड्रग्सचे तस्करी मधील आरोपींना मदत करणाऱ्या पोलिसांना 311 कलमाखाली खाली निलंबित करण्यात येईल, असा इशारा फडणवीस यांनी दिला.
जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी गणेशोत्सवाचे आयोजन केले जाते, तेव्हा दरवर्षी सेलिब्रिटी तिथे जातात. विविध क्षेत्रातील दिग्गज त्यांच्या घरी दर्शनासाठी येतात. एल्व्हिशने रियॅलिटी शो जिंकला होता. त्यावेळी एल्विसवर कोणतेही आरोप नव्हते. अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नाव या प्रकरणात ओढणे चुकीचे आहे. जर कोणी दोषी आढळला तर त्याला शिक्षा होईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App