जरांगेंच्या आंदोलनामुळे जेवढी मराठा मतांमध्ये एकजूट, तेवढीच मराठा + इतरांच्या मतांमध्ये फाटाफूट; वाचा आकडेवारी!!

2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मनोज जरांगे यांनी चालविलेले मराठा आरक्षण आंदोलन आता संपूर्ण राजकीय वळणावर आले असताना अर्थातच त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर होणे अपरिहार्य आहे. पण प्रत्यक्षात मतदान आणि त्याचा निकाल हा सरळ सरळ आकडेमोडीचा खेळ आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचे राजकीय मूल्यमापन करताना मतदानाची टक्केवारी आणि त्याचे प्रत्यक्ष प्रमाण याचा आकडेवारीनिशी धांडोळा घेतला असता, जे वास्तव समोर येते, तेच वर शीर्षकात मांडले आहे. Manoj jarange’s maratha agitation may polarise maratha votes, but it may also counter polarise maratha + obc votes more!!

जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठा मतांमध्ये जेवढी एकजूट होईल, तेवढीच मराठा + इतर समाजांच्या मतांमध्ये फाटाफूट देखील होईल, असाच निष्कर्ष आकडेवारीतून काढावा लागेल. कारण मागासवर्ग आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात मराठा समाज हा 28 % आहे. याचा अर्थ महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 12 कोटी + धरली, तर मराठा समाजाची एकूण लोकसंख्या 3 कोटी 36 लाखांच्या आसपास येते.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातल्या मतदारांची 9 कोटी 12 लाख 43 हजार 10 एवढी मतदार संख्या येते. म्हणजे हे सर्वजण लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीसाठी मतदानास पात्र ठरलेले मतदार आहेत. या नेमक्या आकडेवारीचा नेमका हिशेब काढला, तर मराठा समाजाच्या मतांचे एकूण प्रमाण आणि बाकीच्या समाजांचे एकूण प्रमाण यातली नेमकी तफावत लक्षात येते.

मराठा समाजाची एकूण लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात 28 % आहे. हा आकडा कुठल्या दाव्यातला नसून न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी महाराष्ट्र सरकारला नुकत्याच सादर केलेल्या मागासवर्गीय आयोगाच्या अहवालातला हा आकडा आहे. याचा अर्थ हा अधिकृत आकडा आहे. अर्थात मराठा समाजाची एकूण लोकसंख्या 28 % आहे, याचा अर्थ मतदारांचे प्रमाण 28 % आहे, असा नव्हे, तर त्या प्रमाणात मराठा समाजाचे मतदार साधारणपणे 20 ते 23 % असल्याचे गृहीत धरता येते. याचा अर्थ महाराष्ट्रात मराठा मतदार टक्केवारीच्या पातळीवर 20 ते 23 % टक्के असे गृहीत धरले, तर साधारण 9 कोटी 12 लाख मतदारांपैकी 2.75 ते 3 कोटी मतदार मराठा आहेत, असे गृहीत धरावे लागते.

आता या 2.75 ते 3 कोटी मराठा मतांपैकी सगळी मते एकाच पक्षाकडे झुकतील किंवा एकाच पक्षाकडे जातील याची राजकीय अनुभवानुसार शक्यता फारच दुरापास्त आहे. कारण मराठा समाज पारंपारिक दृष्ट्या सत्ताधारी समाज आहे आणि तो विविध सत्ताधारी पक्षांमध्ये विखुरला गेलेला पदाधिकारी पदांवर असलेला समाज आहे. अर्थातच मराठा समाजाची विशिष्ट एकगठ्ठा मते निश्चित स्वरूपात एखाद्या विशिष्ट पक्षाला मिळू शकतील, पण संपूर्णपणे ती एकाच पक्षाला मिळतील ही शक्यता सूतराम नाही. उलट मराठा समाजाचे जेवढे ध्रुवीकरण होईल, तेवढेच किंबहुना त्यापेक्षाही जास्त प्रतिध्रुवीकरण मराठा समाजासह इतर समाजाच्या मतांचेही होईल, जी आकडेवारी 52 ते 72 % दरम्यान फिरत राहील. या टक्केवारीचा नेमका अर्थ समजावून घेतला, तर मराठा समाजातल्या साधारणपणे 3 कोटी मतांपैकी अगदी 2 ते 2.50 कोटी मते जरी एका विशिष्ट पक्षालाच गेली, तरी साधारणपणे 5.25 ते 7 कोटी मते प्रतिध्रुवीकरणातून बाकीच्या पक्षांना मिळतील ही आजची वस्तुस्थिती आहे. 5.25 ते 7 कोटी मते हा आकडा बिलकूल कमी नाही. किंबहुना तो खरा निर्णायक आकडा आहे.

कारण राजकीय अभिसरणाची प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये ज्या वेगाने होते तेवढी उत्तर प्रदेश, हरियाणा – पंजाब किंवा दक्षिणेतले तामिळनाडू अशाच राज्यांमध्ये होताना आढळते. अर्थात मनोज जरांगे यांच्या आंदोलनातून मराठा समाज एकवटला ही वस्तुस्थिती आहे. मराठा समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण होणार वस्तुस्थिती आहेच, पण ते ध्रुवीकरण मराठा समाजाला विशिष्ट सत्तेच्या टप्प्यापर्यंत नेऊनच पोहोचवेल याची कुठलीही गॅरंटी नाही. किंबहुना तशी गॅरंटी निदान आकडेवारीतून तरी देता येणे शक्य दिसत नाही. कारण महाराष्ट्रातल्या एकूण 9 कोटी 12 लाख मतदारांपैकी जर 2.50 ते 3 कोटी मराठा मतदार असतील आणि ते एकवटतील, तर प्रतिध्रुवीकरण होऊन उरलेले 5.25 ते 7 कोटी मतदार इतर पक्षांकडे वळून त्यांना सत्तेच्या जवळ नेण्यास किंबहुना सत्तेवर बसवण्यास साहाय्यभूत ठरतील. ही महाराष्ट्रातली आजची राजकीय वस्तुस्थिती आहे जी मतदारांच्या टक्केवारीतून आणि आकडेवारीतून समोर येते.

– महाराष्ट्रातील मतदार संख्या

– एकूण मतदार : 9 कोटी 12 लाख 43 हजार 10

प्रारुप मतदार यादीच्या तुलनेत अंतिम मतदार यादीत 18 ते 29 वयोगटातील मतदारांची संख्या 14 लाख 3 हजार 798 ने वाढून ही संख्या आता 1 कोटी 73 लाख 63 हजार 865 इतकी झाली आहे.

– 24 लाख 33 हजार 766 मतदारांनी नव्याने नावनोंदणी केली, तर 20 लाख 21 हजार 350 मतदारांची नावे वगळण्यात आली. त्यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये 4 लाख 12 हजार 416 मतदारांची निव्वळ वाढ झाली आहे.

– नव्याने वाढलेल्या मतदारांमध्ये 1 लाख 1 हजार 869 पुरुष, 3 लाख 8 हजार 306 स्त्री मतदार तसेच 572 तृतीयपंथी मतदारांची निव्वळ वाढ झाली आहे. त्यामुळे मतदार यादीतील स्त्री-पुरुष गुणोत्तर 917 वरून 922
एवढे झाले आहे.

– महाराष्ट्रात एकूण मतदारांची संख्या 9 कोटी 12 लाख 43 हजार 10 इतकी झाली आहे. त्यात 4 कोटी 74 लाख 72 हजार 379 पुरुष, 4 कोटी 37 लाख 66 हजार 808 महिला मतदार, तर 5 हजार 492 तृतीयपंथी मतदार आहेत.

सर्वाधिक मतदार असलेला जिल्हा : पुणे ८१ लाख २७ हजार १९

सर्वात कमी मतदार असलेला जिल्हा : सिंधुदुर्ग ६ लाख ५७ हजार ७८०

विशेष शिबिरांमधून भटक्या व विमुक्त जमातीच्या एकूण १६ हजार ४४३ जणांची मतदार नोंदणी करण्यात आली. तर कातकरी (काथोडी), माडिया गोंड, कोलाम या समूहातील ३८ हजार ८७६ मतदारांचा समावेश करण्यात आला आहे.

– श्रीकांत देशपांडे, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य

Manoj jarange’s maratha agitation may polarise maratha votes, but it may also counter polarise maratha + obc votes more!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात