मनोज जरांगेंची उर्मट भाषा, आंदोलनातील मास्टरमाईंड विरुद्ध विधानसभेत उद्रेक; सर्व प्रकरणाच्या एसआयटी चौकशीचे आदेश!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मनोज जरांगेंनी पंतप्रधान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री यांच्याविरुद्ध वापरलेली उर्मट भाषा त्यांच्या आंदोलनातून झालेली दगडफेक आंदोलना मागचा मास्टरमाईंड याविषयी महाराष्ट्र विधानसभेत प्रचंड उद्रेक पाहायला मिळाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या उद्रेकाची दखल घेऊन मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या हिंसक बाजूची स्पेशल इन्व्हिस्टगेशन टीम मार्फत चौकशी करण्याचे आदेश शिंदे – फडणवीस सरकारला दिले. Manoj Jarange’s eloquent language, the mastermind of the movement, erupted in the assembly

भाजपचे सदस्य आमदार आशिष शेलार यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या आधारे मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला. त्यासाठी त्यांनी काल मुंबई हायकोर्टाने मनोज जरंग यांच्या आंदोलनावर आणि सरकारने न केलेल्या कारवाईवर ओढलेल्या ताशेऱ्यांचा हवाला दिला. मनोज जरांगे हे पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्याचे मंत्री यांच्याविरुद्ध वाटेल त्या भाषेत आरोप करतात. त्यांना शिवीगाळ करतात. अरे तुरेची भाषा वापरतात. महाराष्ट्र बेचिराख करण्याची भाषा करतात. याची हिंमत त्यांच्यासारख्या व्यक्तीला येते कुठून??, त्यांचा मास्टरमाईंड कोण आहे??, हे स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम मार्फत शोधा. तसे आदेश सरकारला द्या, अशी मागणी असे शेलार यांनी केली.

शेलार यांच्या मागणीला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांनी पाठिंबा दिला, पण विरोधी पक्ष नेत्यांनी मनोज जरांग यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने सध्या महाराष्ट्रात मराठा समाजाचा “हिरो” कोण होऊ पाहत आहे??, असा खोचक सवाल केला. त्यांच्या आंदोलनाचा बॉल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात ढकलण्याचा प्रयत्न केला. मुळात मनोज जरांगेंच्या आंदोलनात गोळीबार कोणी आणि का केला??, इथपासून चौकशी करा, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

त्यावेळी विधानसभेत थोडा गोंधळ झाला. दोन्ही बाजूचे सदस्य वेलमध्ये उतरले. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांना सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.

सभागृह पुन्हा सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही सभागृहात आले. विधानसभा अध्यक्षांनी या सर्व गंभीर प्रकरणाची स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम मार्फत चौकशी करण्याचे आदेश सरकारला दिले. पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्याचे मंत्री हे संविधानिक पद भूषवतात. ते देशाच्या सेवेसाठी काम करतात. त्यांना महाराष्ट्रात येऊ देणार नाही. त्यांच्या सभा होऊ देणार नाही, अशी वक्तव्ये करण्याचा कोणालाही अधिकार नाही. सबब सरकारने या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम मार्फत चौकशी करावी, असे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिले.

उपमुख्यमंत्र्यांनी या सगळ्या गंभीर प्रकाराची दखल घेऊन ही चौकशी करणार असल्याचे जाहीर केले. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला इंधनपुरवठा कोणी केला??, कुणाच्या घरात बैठका झाल्या??, मनोज जरांगे सध्या कुणाकडे राहत आहेत??, कुणाच्या कारखान्यातून दगडफेक करण्याचे आदेश आले??, प्रत्यक्ष दगड कुणी पुरवले?? त्यामुळे पोलिसांना का लाठीमार करावा लागला??, मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागचा मास्टरमाईंड कोण आहे?? मराठा समाजाने 56 मोर्चे काढले त्यावेळी शांतता राहिली पण आत्ताचे आंदोलन हिंसक करण्यामागे कोणाची फूस आणि चिथावणी राहिली??, या सगळ्याची चौकशी स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधनात विधानसभेत दिली.

अब उंट आया पहाड के नीचे

या सगळ्या प्रकारामुळे मनोज जरांगे यांचे आंदोलन आता खऱ्या अर्थाने स्कॅनर खाली आले आहे. मनोज जरांगे यांची भाषा तर उर्मट आहेच, पण ते पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्याचे मंत्री यांच्यावर करीत असलेल्या आरोपांची स्क्रिप्ट शरद पवार सुप्रिया सुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याच स्क्रिप्ट सारखी आहे हे देखील उघड झाले.

आत्तापर्यंत मनोज जरांगे यांच्या भोवतालचा समाज पाहून कुठल्याच राजकीय पक्षाची आणि नेत्यांची त्यांच्याबाबत बोलायची हिंमत होत नव्हती. परंतु मनोज जरांगे यांची भाषा घसरली. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जातिवादी आरोप केले. त्यानंतर मात्र सरकारला या सगळ्या प्रकाराची दखल घेऊन त्यांच्या आंदोलनाची सगळी पाळेमुळे खणून काढण्याची गरज निर्माण झाली. आता प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात होणार आहे.

Manoj Jarange’s eloquent language, the mastermind of the movement, erupted in the assembly

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात