विशेष प्रतिनिधी
मुंबई : Manoj Jarange न्यायालयाने मंगळवारपर्यंत मुंबईतील रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिल्यानंतर, मनोज जरांगे यांनी आंदोलकांना मुंबईकरांना त्रास होईल असे वर्तन करू नका, तसेच कुणाचेही ऐकून गोंधळ न घालण्याचे आवाहन जरांगे यांनी केले आहे.Manoj Jarange urges those who are creating ruckus
मनोज जरांगे म्हणाले की, मुंबईच्या रस्त्यांवरील गाड्या आझाद मैदानाच्या जवळील क्रॉस मैदानात लावा आणि तिथेच झोपा. जे आंदोलक ऐकणार नाहीत, त्यांनी गावी परत जावे. कुणाच्या आदेशावरून हुल्लडबाजी करणाऱ्यांना आंदोलनात स्थान नाही. मी शेवटचे सांगतोय, आंदोलनाला बदनाम करू नका, अन्यथा सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनात काही ठिकाणी हुल्लडबाजी होत असल्याचा आणि न्यायालयाच्या निर्देशांचे पालन केले जात नसल्याचा आरोप एका याचिकेद्वारे न्यायालयात करण्यात आला होता. त्यावर, न्यायालयाने मंगळवारी दुपारपर्यंत मुंबईतील सर्व रस्ते रिकामे करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर जरांगे यांनीही लगेच आंदोलकांना आवाहन केले.
मला पुन्हा पुन्हा बोलायला सांगू नका
मनोज जरांगे म्हणाले, मुंबईकरांना त्रास होईल असे वागू नका, कुणाचे ऐकून गोंधळ घालू नका. पण कधीही लोकांना त्रास झाला नाही, पत्रकारांना त्रास झाला नाही. त्यामुळे तुम्ही संयमाने वागा. आमच्यात कुणीतरी घुसून बदनाम केले जात आहे. मला पुन्हा पुन्हा बोलायला सांगू नका, सगळ्यांनी मैदानावर गाड्या लावा. आख्खी मुंबई जेवेल एवढे जेवण ग्रामीण भागातून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App