विशेष प्रतिनिधी
मुंबई : Manoj Jarange मुंबईतले मराठा आरक्षण आंदोलन हाताबाहेर गेले. त्या आंदोलनात महिला पत्रकारांची छेड काढली. फक्त आझाद मैदानात 5000 लोकांना आंदोलन करायची परवानगी दिली असताना सगळ्या मुंबईला भेटीला धरले. न्यायमूर्तींच्याही गाड्या अडविल्या. आंदोलनामुळे मुंबईत अराजक निर्माण झाले. त्यामुळे मुंबई पुढच्या 24 तासांत खाली करा आंदोलन फक्त आझाद मैदानापुरते मर्यादित ठेवा, असे स्पष्ट आदेश हायकोर्टाने दिल्यानंतर मनोज जरांगे यांच्या वकिलांकडून आंदोलनाची जबाबदारी झटकायला सुरुवात झाली.Manoj Jarange
मराठा आरक्षण आंदोलनात न्यायालयाच्या आदेशांचे पालन करा, असे आदेश मनोज जरांगे यांनी आंदोलकांना दिले, पण आंदोलनात काही समाजकंटक घुसलेत. त्यांनी मुंबईच्या रस्त्यांवर अराजक माजविले आहे असा दावा मनोज जरांगे यांचे वकील पिंगळे यांनी करून आंदोलनाची जबाबदारी मनोज जरांगे यांच्या अंगावरून झटकायचा प्रयत्न केला. सरकारने मनोज जरांगे यांची मागणी केली असती, तर आंदोलनाची वेळ झाली नसती. आंदोलक मुंबईत आले नसते. मुंबईकरांना त्यांचा त्रास झाला नसता. पण सरकारने जरांगे यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले म्हणून मराठा आरक्षण आंदोलकांना मुंबईत यावे लागले, असा उलटा आरोप मनोज जरांगे यांचे वकील पिंगळे यांनी केला.Manoj Jarange
मराठा आंदोलनात कोर्टाच्या आदेशानुसार 5000 लोकांनाच आझाद मैदानावर थांबायला मनोज जरांगे यांनी सांगितले होते पण या आंदोलनात काही समाजकंटक घुसले. त्या घुसखोरांच्या सगळ्या वाईट गोष्टी माध्यमांनी दाखविल्या. त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलन बदनाम होते आहे, असा दावाही वकील पिंगळे यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App