नाशिक : ऐन गणेशोत्सवात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापवून थेट मुंबई गाठायचा बेत केलेल्या मनोज जरांगे यांनी आज अंतरवली सराटीत पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातले फडणवीस सरकार उलथवण्याची भाषा केली. फडणवीस सरकारने मराठा आरक्षण लागू केले नाही. सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी केली नाही, तर सरकार उलथून लावल्याशिवाय आम्ही मुंबईतून हलणार नाही, अशी गर्जना मनोज जरांगे यांनी केली. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर नेहमीच आरोप केले. Manoj jarange
गणेशोत्सव सुरू झाल्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईला पोहोचण्याची तयारी करणाऱ्या मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी गणेशोत्सवाचा मुहूर्त निवडला. यातूनच त्यांच्या आंदोलनाच्या मूळ हेतूंविषयी शंका निर्माण झाली. मराठा समाजाने आपला व्यापार, उद्योग, धंदा काही दिवस बंद ठेवावा. नोकरदारांनी सुट्टी टाकावी. डॉक्टरांनी गोळ्या औषधे घेऊन मराठा समाजाच्या मुंबईच्या मोहिमेत सामील व्हावे. राजकीय नेत्यांनी आपापल्या गाड्या मुंबईच्या मोहिमेसाठी द्याव्यात. आरक्षण घेतल्याशिवाय थांबू नये, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.
मुंबईत येऊन आम्हाला ट्रॅफिक जाम करायचे नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला एक रस्ता द्यावा. त्या रस्त्यावरून आम्ही आझाद मैदानावर पोहोचू. तिथे आंदोलन करू, असेही मनोज जरांगे म्हणाले. मराठा समाजाने शांततेने मुंबईला यावे तिथे शांततेत राहावे. कुणीही दंगल करू नये. दगडफेक करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
ऐन गणेशोत्सवात मराठा आरक्षणाचा विषय पेटवून सरकारची कोंडी करायचा मनोज जरांगे यांचा इरादा लपून राहिला नाही. पण त्याचबरोबर मराठा समाजातल्या लोकांना उद्योग नोकरी व्यवसाय धंदा बंद ठेवण्याचे आवाहन करून मनोज जरांगे यांनी काय साध्य केले??, हे कळायला मार्ग नाही.
288 उमेदवार देणार होते, त्याचे काय झाले??
2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मनोज जरांगे यांनी अशीच मोठी घोषणा केली होती सगळ्या राजकीय पक्षांनी मराठ्यांचा फक्त वापर करून घेतला स्वतःसाठी खुर्च्या बळकावल्या पण मराठा समाजाला कुणीही आरक्षण दिले नाही म्हणून आता मराठा समाजातूनच तरुणांना उमेदवारी देऊन विधानसभा निवडणुकीत उतरवायची तयारी मनोज जरांगे यांनी केली होती त्यासाठी राज्यभरातून त्यांनी मोठ्या प्रमाणावर मराठा तरुणांचे अर्ज देखील मागवले होते मराठा तरुणांनी त्यांना मोठा प्रतिसाद देत आठ लाखाहून अधिक अर्ज त्यांच्याकडे पाठविले होते त्या अर्जांची छाननी करून विधानसभा निवडणुकीसाठी 288 उमेदवार देण्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली होती. उमेदवार निवडीसाठी मोठमोठ्या बैठका त्यांनी घेतल्या होत्या आज उमेदवार जाहीर होतील उद्या उमेदवार जाहीर होतील, अशी आशा त्यांनी मराठा तरुणांना लावली होती. मनोज जरांगे यांच्या मराठा उमेदवारांची मोठी चर्चा माध्यमांमध्ये होती छत्रपती संभाजी राजे यांनी मनोज जरांगे यांच्याकडे प्रस्ताव देखील दिला होता तुम्ही आमच्या स्वराज्य पक्षाला उमेदवार पुरवा. आम्ही 50 जणांना उमेदवारी देऊ, असे संभाजी राजे म्हणाले होते.
जरांगेंच्या उमेदवारांना कुणाचा अडथळा??
प्रत्यक्षात विधानसभा निवडणूक झाली. पण मनोज जरांगे यांनी जाहीर केल्यानुसार 288 उमेदवार सोडा, एकही उमेदवार ते जाहीर करू शकले नव्हते. स्थानिक ठिकाणी निर्णय घेऊन मराठा समाजाने एकगठ्ठा मतदान करावे, असे आवाहन करून त्यांनी मराठा समाजालाच संभ्रमात टाकले होते. 288 उमेदवार देण्याचे जाहीर करून देखील मनोज जरांगे कुठल्या कारणामुळे उमेदवार जाहीर करू शकले नव्हते??, त्यांच्या उमेदवारी जाहीर करण्यामध्ये नेमके कुणी अडथळे आणले होते??, मनोज जरांगे यांनी उमेदवार उभे केले असते, तर कुणाचे नुकसान झाले असते??, या सवालांवर त्यावेळी बरीच चर्चा झाली होती पण मनोज जरांगे यांच्याकडून त्याची खरी उत्तरे दिली गेली नव्हती. मनोज जरांगे ठरल्याप्रमाणे उमेदवार जाहीर करू शकले नव्हते, एवढेच राजकीय सत्य महाराष्ट्र समोर आले होते.
असे 288 उमेदवार देतो म्हणून जाहीरपणे सांगणारे मनोज जरांगे एकही उमेदवार उभे करू शकले नव्हते. ते मनोज जरांगे ऐन गणेशोत्सवात मराठा आरक्षणाचा विषय तापवून महाराष्ट्रातले सरकार उलथवून टाकायला निघाले आहेत. ते तसे करू शकतील का??, या सवालाचे उत्तर पुढच्या काही दिवसांतच मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App