नाशिक : मनोज जरांगे यांनी मौलाना सज्जाद नोमानी आणि आनंदराज आंबेडकर यांना एकत्र आणून अंतरवली सराटीत पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी मराठा मुस्लिम आणि दलित एकत्र आल्याचा दावा केला, पण या सगळ्यांमध्ये मनोज जरांगे यांनी परिवर्तन महाशक्तीतल्या संभाजी राजे छत्रपती यांच्यासारख्या नेत्यांना बाजूला केले, पण उत्तर प्रदेशातल्या मौलानांना महाराष्ट्राच्या राजकीय पटावर आणले. यातून त्यांनी नेमके काय साध्य केले??, याची चर्चा आता महाराष्ट्रात सुरू झाली आहे.
मौलाना सज्जाद नोमानी हे महाराष्ट्राच्या राजकीय पटावर आधी कधीही इतक्या ठळकपणे आले नव्हते. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते म्हणून ते प्रामुख्याने उत्तर प्रदेशाच्याच राजकारणावरील सक्रिय होते. महाराष्ट्रात मुस्लिम उमेदवारांची यादी महाविकास आघाडीला देणे, त्यांच्यासाठी आग्रह धरणे, असा प्रकार आधी मौलाना सज्जाद नोमानी यांनी करून पाहिला. परंतु, महाविकास आघाडीने त्यांना दाद दिली नाही. त्या मौलाना सज्जाद नोमानी यांना मनोज जरांगी यांनी महाराष्ट्राच्या राजकीय पटावर शिरकाव करण्याची संधी दिली.
वास्तविक संभाजी राजे छत्रपती यांनी खुलेपणाने मनोज जरांगेंना त्यांच्या मर्जीतले उमेदवार स्वराज्य पक्षाच्या चिन्हावर उभे करावेत, असे आवाहन केले होते. यातून स्थानिक मराठा राजकारण बळकट करण्याचा त्यांचा इरादा होता त्यामध्ये स्वराज्य पक्षाला उमेदवार मिळवण्याचा तसा प्रयत्न होता तसाच स्थानिक मराठा शक्ती प्रभावी करून त्या आमदारांचा दबाव गट आपल्या आणि जरांगे यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली तयार करण्याचा त्यांचा इरादा लपून राहिला नव्हता पण जरांगे यांनी संभाजी राजे छत्रपती यांचा स्वराज्य पक्षाचा प्रस्ताव फेटाळला.
त्या उलट महाराष्ट्रात पॉलिटिकली फारसे रेलेव्हंट नसलेले आनंदराज आंबेडकर आणि उत्तर प्रदेशातले मौलाना सज्जाद नोमानी यांना जवळ केले. यातून कदाचित जरांगे यांनी स्वतःचे मराठा नेतृत्व अधिक ठसविण्याचा प्रयत्न केला असला, तरी मुस्लिम मतदार आणि उमेदवार यांच्यातल्या एकगठ्ठा मतदानाचे राजकीय संबंध लक्षात घेतले, तर मनोज जरांगे यांच्या मराठा उमेदवारांना मुस्लिम मतदार कितपत एकगठ्ठा मतदान करतील??, याविषयी आत्ताच शंका बोलून दाखविल्या जात आहेत आणि त्यांना लोकसभा निवडणुकीतल्या मतदानाच्या पॅटर्नचा आधार दिला जात आहे.
आमदार मास्टरमाईंडच्या झोळीत??
खुद्द जरांगे यांना मराठा आरक्षणाचा महाराष्ट्रातला विषय बाजूला टाकून फक्त देवेंद्र फडणवीस यांना पराभूत करून राष्ट्रीय राजकारणामध्ये काही वेगळी झेप घ्यायची असेल, तर हा भाग अलहिदा, पण मुस्लिमांनी स्वतःच्या एकगठ्ठा हा मतदानाच्या बळावर किंवा राजकीय ताकदीवर दुसऱ्या कुठल्या समाजाच्या नेत्याचे नेतृत्व भारतात कुठे उभे केल्याचा किंवा ते नेतृत्व स्वीकारल्याचा इतिहास आणि वर्तमान नाही. त्यामुळे भविष्यात जरांगे यांचे नेतृत्व मौलाना सज्जाद नोमानी यांच्या आधारावर नेमकी कोणती दिशा पकडेल??, की जे काही आमदार महाराष्ट्रात निवडून आणता येतील, ते मास्टरमाईंडच्या झोळीत टाकून जरांगे मोकळे होतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App