अखेर जरांगेंचा पवार + ठाकरे + पटोलेंना सवाल, पण एकाच वाक्यात; बाकी टीकेच्या तोफा भाजपवरच!!

Manoj jarange questions pawar, thackeray and patole, but targets BJP leaders

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी अखेर शरद पवार उद्धव ठाकरे आणि नाना पाटोळे यांना प्रश्न विचारला पण तो देखील एकाच वाक्यात!! मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण हवे आहे .त्याबद्दल शरद पवार उद्धव ठाकरे आणि नाना पटेल यांनी भूमिका स्पष्ट करावी. त्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही, तर सरकारने आम्हाला त्यांची हरकत नसल्याचे गृहीत धरून आरक्षण द्यावे, असे वक्तव्य मनोज जरांगे यांनी केले. Manoj jarange questions pawar, thackeray and patole, but targets BJP leaders

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर आपल्या गावात परतले. गावात सुरू असलेल्या यात्रेला भेट दिली. ग्राम दैवत सय्यद बाबा पिराचे दर्शन घेतले. शुक्रवारी मनोज जरांगे यांनी पुन्हा माध्यमांशी संवाद साधला. मनोज जरांगे फक्त भाजपच्या नेत्यांवर विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावरच टीका करतात त्यांच्यावरच तोंड सुख घेतात पण ते ज्यांनी मराठा आरक्षण नाकारले किंवा देण्याचे टाळले त्या शरद पवारांना उद्धव ठाकरेंना किंवा नाना पटोळे यांना कधीच प्रश्न विचारत नाहीत असे शरसंधान भाजपचे नेते अशी शेलार यांनी जरांगे यांच्यावर साधले होते गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते आक्रमकपणे मनोज जरांगे आणि शरद पवार यांची छुपी युती सातत्याने एक्सपोज करत आहेत.

या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी आज एकाच वाक्यात शरद पवार उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांना मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले. आज त्यांनी टीकेचा रोख आशिष शेलार यांच्याकडे वळवला. आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर देण्याच्या प्रयत्न करु नये. मराठ्यांना चॅलेंज करू नये. मी जर बिघडलो तर तुम्हाला तोंड बाहेर काढता येणार नाही, असा हल्ला चढवला. राजकीय भूमिका घेऊन मनोज जरांगे पाटील बोलायला लागल तेव्हा आम्ही सडेतोड उत्तर देऊ, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला होता. त्यावर जरांगे यांनी उत्तर दिले.



ते मराठेच नाहीच…!!

मागच्या दारातून गेलेल्यांना आम्ही मराठे समजतच नाही. मैदानात असणाऱ्यांना मराठे म्हणून मोजतो, असा दावा मनोज जरांगे यांनी केला. ते म्हणाले की, राजकारणाचे गणित वेळेवर केले जाते. राजकारणात काही गणित सांगयला नको. तो नियम मी पाळतो. बच्चू कडू म्हणतात ते खरे आहे. ते शेतकऱ्यांची भूमिका मांडणारे आहेत. हे आशिष शेलार यांनी समजून घ्यायला पाहिजे. त्यांनी बच्चू कडू यांना प्रत्युत्तर देण्याच्या भानगडीत पडू नये. मराठ्यांना चॅलेंज करू नये. मी बोलत नाही म्हणून तुम्ही बोलायला लागले, असे समजू नका. भाजपच्या लोकांचे डोके काम करत नाही. आम्ही त्यांना भाव देत नाही. शेवटी मराठ्यांपुढे ते शांत बसले नाहीत, तर तुमचं राजकीय करिअर मराठा संपवून टाकेल, अशी धमकीची भाषा जरांगे यांनी वापरली.

ओबीसी रॅली भुजबळांच्या हट्टामुळे

ओबीसी यात्रेवर मनोज जरांगे यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला रॅली काढण्याचा अधिकार आहे. परंतु विनाकारण एखादा जातीच्या विरोधात रोष निर्माण करायचा टार्गेट निर्माण करायचा यासाठी रॅली नको. ही रॅली छगन भुजबळ यांच्या हट्टापायी आहे.

मराठ्यांकडे खूप पुरावे

खूप काही असे पुरावे आहेत जे आता मराठ्यांसंदर्भात सापडले आहे. हैदराबादमध्ये देखील 8000 पुरावे सापडले. राजकारण्यांनी एकदा तरी जातीच्या आणि लेकराच्या बाजूने न्यायासाठी उभे राहावे. ही संधी गोरगरीब छोट्या छोट्या जातींना न्याय देण्याची आली आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. मराठे समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिले पाहिजे की नाही, याबाबत त्यांनी बोलावे. जर विरोधक भूमिका स्पष्ट करत नसतील, तर सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावला.

Manoj jarange questions pawar, thackeray and patole, but targets BJP leaders

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात