प्रतिनिधी
जालना : मराठा आरक्षण आंदोलन दरम्यान बीड जिल्ह्यात समाजकंटकांनी राष्ट्रवादीच्या दोन आमदारांची घरी जाळली. manoj jarange patil press conference
एसटी सह अनेक ठिकाणी मालमत्तांचे नुकसान केले जाळपोळ करणाऱ्यांविरुद्ध 307 कलमानुसार गुन्हे दाखल करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले त्यामुळे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील संतापले आणि त्यांनी अरे तुरेच्या भाषेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. बीडचे जिल्हाधिकारी जातीयवादी असल्याचा आरोपही त्यांनी केला. manoj jarange patil press conference
बीडमध्ये मराठा आंदोलनात समाजकंटकांनी काल जाळपोळ केली. आमदार प्रकाश सोळंके आणि आमदार संदीप क्षीरसागर यांची घरे जाळली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून जाळपोळ करणाऱ्यांना 307 कलमांतर्गत गुन्हा दाखल होईल, असा इशारा दिला. देवेंद्र फडणवीस यांनी केसेस दाखल करण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर मनोज जरांगे यांनी अरे तुरेच्या भाषेत टीका केली.
मनोज जरांगे म्हणाले :
अकेला देवेंद्र क्या करेगा??, विचारणाऱ्या सुप्रिया सुळेंना आता भाजपने फडणवीसांवर “अन्याया” केल्याचे “दुःखR
‘असं वागल्यावर काय घंट्याचं मोदी परत पंतप्रधान होतील’
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देवेंद्र फडणीस यांना फोन करुन महाराष्ट्राच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय. याबाबत मनोज जरांगे यांना प्रश्न विचारला असता “मला फोन करा. मी सांगतो काय परिस्थिती आहे. ते कधी सांगणार नाहीत. त्या माणसावर काल आमची माया आली होती. पण केसशिवाय दुसरं काही बोलतच नाही. आमच्याविरोधात केस केले. आता परत केस करायचं बोलत आहेत. दुसरं काहीच येत नाही का??
मार्ग काढू, चर्चा करु, असं बोलता येत नाही. राज्य चालवायला निघाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डबल पंतप्रधान होतील, असं स्वप्न बघत आहेत. असं वागल्यावर काय घंट्याचं होतील का?? एवढ्या मोठ्या नेत्याने काय बोलावं, केसेस शिवाय काही बोलतच नाहीत. आमच्या मराठ्यांच्या डोक्यावर जेवढे केस आहेत तेवढे केसेस आहेत. अमित शाहांनी इतर सर्वांना सोडून दिलं आणि त्यांनाच फोन करतात. त्यांच्याकडे काय आहे. त्यांनी सर्व इचको करुन ठेवलाय. तुमचाही इस्कोट होईल. मग तुम्हाला घरी जावं लागेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App