Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंना ठार मारण्याची धमकी; चौकशीची मागणी; वाल्मीक कराड समर्थकाचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

Manoj Jarange Patil

विशेष प्रतिनिधी

जालना : Manoj Jarange Patil  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा एकदा गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियात या प्रकरणी एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. त्यात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडचे नाव आल्यामुळे धमकी देणारा व्यक्ती कराड समर्थक असल्याचा दावा केला जात आहे. दिव्य मराठी या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही.Manoj Jarange Patil

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर रान पेटवले होते. या प्रकरणी त्यांनी संतोष देशमुख हत्याकांडाचा मुद्दाही लावून धरला होता. या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवा हात मानल्या जाणाऱ्या वाल्मीक कराडला अटक झाली आहे. त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या घटनाक्रमामु्ळे धनंजय मुंडे व मनोज जरांगे यांच्यातील राजकीय वितुष्ट वाढले आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांना फोनवरून कथित धमकी देण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे यांना गोळ्या घालण्याची धमकी देणारी एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल आहे.Manoj Jarange Patil



सदर कॉल रेकॉर्डिंगमध्ये एक व्यक्ती समोरच्या व्यक्तीशी संवाद साधताना थेट मनोज जरांगेंना गोळ्या घालून ठार मारण्याची भाषा करताना दिसून येत आहे. विशेषतः हा व्यक्ती पुन्हा धनंजय मुंडे व वाल्मीक कराड म्हणायचे नाही, अन्यथा तुलाही जीवे मारतो अशी धमकीही सदर व्यक्तीला देताना ऐकू येत आहे.

काय आहे ऑडिओ क्लिपमध्ये?

जरांगे समर्थक – पाटलांना काय करणार?
कराड समर्थक – मनोज जरांगे यांना कधी गोळ्या घालायच्या. मी स्वतः गोळ्या घालतो.
जरांगे समर्थक – तू गोळ्या घालणार आहेस का?
कराड समर्थक – हो स्वतः गोळ्या घालतो.
जरांगे समर्थक – काय करणार आहेस तू पाटलांना?
कराड समर्थक – मी तर मनोज जरांगे यांना जीवेच मारतो.
जरांगे समर्थक – बरं.. चालतंय.. बरं…

या ऑडिओ क्लिपमध्ये धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांचे नाव घेऊन धमकावण्यात येत असल्याचेही निदर्शनास येत आहे. तुझ्या …. जर गोळ्या घातल्या नाही, तर मुंडे व वाल्मीक कराड पुन्हा म्हणायचे नाही, असेही हा धमकी देणारा व्यक्ती म्हणताना ऐकू येत आहे. या ऑडिओ क्लिपमुळे मराठा समाजात एकच खळबळ माजली आहे. ऑडिओ क्लिपमधील या दोन व्यक्ती कोण? असा सवालही या प्रकरणी केला जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांच्यावर आपली सुपारी दिल्याचे गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी काही जणांना अटकही करण्यात आली होती. पण पुढे या प्रकरणात काहीही झाले नाही.

Manoj Jarange Patil Receives Death Threat: Viral Call Linked to Valmik Karad

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात