Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा विश्वास- सरकारचे काम सुरू झाले, आता आरक्षण नक्की, मुंबईचे मालक आम्ही!

Manoj Jarange Patil

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Manoj Jarange Patil मराठा आरक्षण संदर्भात सरकारने काम सुरू केले आहे. आमचे काम सुरू केले तर सरकारला आम्ही मोठेपण देऊ. तुम्ही जर आमचे कामे केले तर आम्ही सरकारचे कौतुकच करु, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.Manoj Jarange Patil

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, अंबानीच्या सुनेने मराठा बांधवांना त्रास दिला हे जर खरं असेल तर मग आम्ही अंबानी काय ते पाहणार नाही. माझ्या मराठ्याला त्रास दिला तर मोकळंच करील. अंबानी यांची सून काही तरी मराठा बांधवांना म्हणाली हे जर खरं असले ना तर मग आम्ही पाहणार नाही. मराठ्याच्या नादी लागायचे नाही. तुम्ही पाहूणे आहात मुंबईचे मालक आम्ही आहोत, असे म्हणत त्यांनी सुमोना चक्रवर्ती वर निशाणा साधला आहे.तर मुंबईचे बेटच मोकळं करील. तिला काय त्रास झाला. मुंबईत सुरक्षित वाटत नसेल तर समुद्रात घर बांधा. अंबानी, शर्मा यांनी नाटक करायचे नाही. आम्ही मुंबईचे मालक आहोत, तुम्ही पाहूणे आहात. मराठ्याला टार्गेट करु नका, नाही तर मी सोडणार नाही.Manoj Jarange Patil



पण तातडीने प्रमाणपत्र द्या

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, देवाभाऊ आशयाचे कुणी बॅनर लावा, कुणी कॅम्पियन करा, आम्ही तुमचे आभार आणि कौतुक करू. मात्र तातडीने प्रमाणपत्र द्या. तुम्ही कामे केल्यास आम्ही तुम्हाला मोठेपणा देऊ. शिंदे समितीस बढती दिल्यास सर्व विभागात नोंदी शोधण्याचे काम सुरूच ठेवा. सरकारने कामे केल्यास आम्ही कौतुकच करू. धनंजय मुंडेंवर बोलणं म्हणजे वर्ष वाया घालवणं, त्यांनी मजा करा, राजकारण करा, पण मराठ्यांच्या वाट्याला गेल्यास मात्र सुट्टी नाही, असा इशारा देत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली आहे.

एकनाथ शिंदे सरळ साधा माणूस

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, एकनाथ शिंदे हे मोकळ्या स्वभावाचा माणूस आहे. ते काम करणारे नेतृत्व आहे. जी आर एकदम ओके आहे. बुळबुळ करणाऱ्याला करु द्यात. मी देतो आहे गरिबांच्या पोरांना मग टेन्शन घ्यायचे नाही. कुणी येऊन काहीही सांगेल आपण ऐकायचे नाही, सरकारने आपल्याला शब्द दिला आहे की जर काही समस्या आली तर नवीन सुधारित जी आर काढणार आहे, असे म्हणत जी आर वर प्रश्न चिन्ह उपस्थित करणाऱ्यावर मनोज जरांगे पाटील यांनी निशाणा साधला आहे.गरीब मराठ्यांनी कुणाचेच ऐकायचे नाही.

कुणाला काहीही बोलू द्या मी समाजाला आरक्षण मिळवून देणार

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, गरीब मराठा बांधवांनी गरीब मराठ्यावर विश्वास ठेवा. काहीही बरळणाऱ्या लोकांनीच मराठा समाजाचे नुकसान केले आहे. मराठवाड्यातील एकही समाज बांधव आरक्षणापासून वंचित राहणार नाही. पश्चिम महाराष्ट्रातील कुणालाही आरक्षणापासून वंचित राहू देणार नाही. मालोजीराजेंना आरक्षण घ्यायचे असेल तर ते घेतील नाही तर नाही घेणार कुणावर जबरदस्ती नाही.

दसरा मेळाव्याचे अवघड

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकारने काढलेल्या जी आर मध्ये बदल करण्यासारखे काहीच नाही. काम प्रत्यक्षात सुरू केले की काय समस्या येतातच. त्यामुळे काम सुरू करावे त्यानंतर जी आरमध्ये थोडा फार बदल करावाच लागतो. गेल्यावर्षी नारायण गडावर दसरा मेळावा घेतला. यावेळी कसे होईल सांगता येत नाही. कारण वेळ कमी राहिला आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याचे अवघड आहे. जसे असेल तसे जितके मराठा बांधव असोत त्यांच्या उपस्थितीत छोटेखानी दसरा मेळावा घेऊ.

तर 1994 चा जी आर रद्द करायला लावू

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आमच्या नोंदी हक्काचे असताना तुम्ही जर कोर्टात जात असताल तर 1994 साली चा जी आर आम्ही देखील रद्द करायला लावू. देवाने आम्हाला भरपूर काही दिले आहे. समाज माझा खूश आहे आता मला काही नको. उद्या दुपारी सुटी झाल्यावर मी गावातील देवांचे दर्शन घेणार आहे. त्यानंतर नारायण गड, शिवनेरी वर जाणार आहे.

त्यानंतर दुसरा मुद्दा हाती घेऊ

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सातारा संस्थानचे गॅझेटिअर लागू झाल्यावर मी दुसऱ्या मुद्या हातात घेऊ. मला सर्व समाज बांधवांचे भले करायचे आहे. मुंडे यांच्या वक्तव्यावर मी काही बोलणार नाही. आमच्या आड आले तर सुटी देणार नाही. तुम्ही तिकडे राजकारण करा, मजा करा पण मराठ्याच्या नादी लागले तर सुटी नाही.

Manoj Jarange Patil Confident of Reservation, ‘We are Owners of Mumbai’

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात