Manoj Jarange : रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे संतप्त; ‘कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?

Manoj Jarange

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Manoj Jarange मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे आणि मुंबई पोलिसांमध्ये आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुंबई पोलिसांनी जरांगे यांना आंदोलनासाठी परवानगी दिली असली, तरी रोज नवीन अर्ज दाखल करण्याची अट घातली आहे. या अटीमुळे संतप्त झालेल्या जरांगे यांनी थेट पोलिसांना परवानगीसाठी अर्ज करताना काही कठोर प्रश्न विचारले आहेत.Manoj Jarange

मनोज जरांगे यांच्या उपोषणाला परवानगी देताना मुंबई पोलिसांनी ‘रोज अर्ज करण्याची’ अट घातली आहे. या अटीमुळे आंदोलकांवरील प्रशासकीय ताण वाढला आहे. याच मुद्द्यावरून जरांगे यांचे वकील आशिषराजे गायकवाड आणि समर्थक पांडुरंग तारक यांनी पोलिसांकडे नवा अर्ज दाखल करत पोलिसांच्या अटींवर सडेतोड प्रश्न विचारले आहेत.Manoj Jarange



मनोज जरांगेंनी कोणते प्रश्न विचारले?

मनोज जरांगे यांनी विचारले, “पहिल्याच अर्जामध्ये बेमुदत आणि आमरण उपोषणाची माहिती दिली असताना, रोज अर्ज देण्याची सक्ती का केली जात आहे?” याचसोबत “कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?” आणि “सुट्टीच्या दिवशी उपोषण करू नये, हे कोणत्या कायद्यात आहे?” असे सवालही उपस्थित केले आहेत. रोजच्या परवानगीसाठी होणाऱ्या धावपळीमुळे आंदोलन कमकुवत होत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. त्यांनी आपल्या अर्जात पुढील आंदोलनासाठी हाच अर्ज ग्राह्य धरावा, अशी ठाम मागणी केली आहे.

संघर्ष वाढण्याची चिन्हे

या प्रशासकीय पेचामुळे सरकार-पोलिस आणि आंदोलकांमध्ये नवा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. रोज अर्ज करण्याच्या अटीमुळे आंदोलकांचा संयम सुटत चालला असून, पोलिस प्रशासनाच्या नावाखाली आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. त्यामुळे, आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

आंदोलनाला उद्याही परवानगी

दरम्यान, मुंबई पोलिसांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाला आणखी एका दिवसाची परवानगी दिली आहे. त्यामुळे मनोज जरांगे उद्या देखील मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत. दरम्यान, एक-एक दिवस मुदतवाढ देण्यात येत असल्याने मनोज जरांगे यांनी काल टीका केली होती.

Manoj Jarange Irate Daily Protest Permit Condition

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात