विशेष प्रतिनिधी
मुंबई : Manoj Jarange मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिल्यानंतर, त्यांनी पोलिसांना हमीपत्र सादर केले आहे. या हमीपत्रात जरांगे यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच पोलिसांच्या अटी-शर्तींचे पालन करण्यासाठी 20 आश्वासने दिली आहेत. आंदोलनादरम्यान कायदा मोडला जाणार नाही, कोणत्याही प्रकारची गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार नाही आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करूनच सर्व कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. हे हमीपत्र मनोज जरांगे यांच्या स्वाक्षरीसह त्यांच्या प्रतिनिधींनी आझाद मैदान पोलिस ठाण्यात सादर केले.Manoj Jarange
या आश्वासनांमध्ये खालील प्रमुख बाबींचा समावेश
मी, कर्तव्यावर असलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने मागणी केल्यावर, त्यास दाखवण्यासाठी दिलेली परवानगीची मूळ प्रत सोबत बाळगेल. मी, पोलीस नियमित संपर्क करू शकतील अश्या पांडुरंग मारक या जबाबदार व्यक्तीची प्रतिनियुक्ती करेल. मी, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी विचारविनिमय करून, पिण्याचे पाणी (टँकरद्वारे पुरवठा करून) आणि प्रथमोपचार/वैद्यकीय मदत यांची देखील सभास्थळी आणि धरणे/निदर्शन कालावधीत पर्याप्त व्यवस्था करेल. मी आणि इतर आयोजक याची खात्री करतील की, धरणे,निदर्शने, इत्यादी सुव्यवस्थित रीतीने करण्यात येईल आणि वाहतुकीच्या सामान्य ओघामध्ये अडथळा आणणार नाही आणि वाहनतळ आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यात येईल. मी आणि इतर व्यक्ती,धरणे-निदर्शने, इत्यादीमध्ये सहभागी होणाऱ्यांची मर्यादा,माझ्या निवेदनात विनिर्दिष्ट केलेल्या संख्येपर्यंतच मर्यादित ठेवील आणि कोणत्याही परिस्थितीत त्यात वाढ होऊ देणार नाही. मी आणि इतर आयोजक याची खात्री करतील की, पोलिसांना सहाय्य करण्यासाठी पुरेशा संख्येतील स्वयंसेवकांना त्या स्थळी आणि त्या स्थळाभोवती तैनात करण्यात येईल आणि तसेच संपर्काच्या तपशिलासह स्वयंसेवकांची यादी आगाऊ स्वरुपात पोलिसांना पुरवील. मी आणि इतर आयोजक याची खात्री करतील की, धरणे-निदर्शनं,सभा,इत्यादी विहित ठिकाणी/स्थळीच घेण्यात येईल. मी आणि इतर आयोजक याची खात्री करतील की, धरणे-निदर्शने, इत्यादी विहित कालावधीत, म्हणजेच सकाळी 09:30 ते सायंकाळी 05:30 या वेळेत घेण्यात येईल. मी आणि इतर आयोजक, ध्वजांसाठी/फलकांसाठी 2 फुटांपेक्षा अधिक लांबीची काठी वापरणार नाही. ध्वजाचा/फलकाचा आकार 9 फूट 6 फूट किंवा त्यापेक्षा कमी असे असेल. सहभाग घेणाऱ्या व्यक्ती, काठीवरील ध्वज/फलक, इत्यादी केवळ प्रदर्शनाच्या हेतूनेच जवळ बाळगतील. मी आणि इतर आयोजक याची खात्री करतील की, धरणे-निदर्शने इत्यादींमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्ती, आक्रमणकारी हत्यार म्हणून वापरले जाण्याचा संभव असतील अशा लाठ्या,अग्निशस्त्रे, भाले, तलवारी आणि इतर वस्तू जवळ बाळगणार नाहीत. मी याची खात्री करील की,सहभागी होणारी कोणतीही व्यक्ती,ज्यामुळे मानवी जीवितास किंवा त्याच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होईल अथवा सार्वजनिक शांतता भंग होईल किंवा दंगा उसळेल असे कोणतेही नकली किंवा इतर कोणतेही अग्निशस्त्र जवळ बाळगणार नाहीत. मी आणि इतर आयोजक, याची खात्री करतील की, सहभागी झालेली कोणतीही व्यक्ती,चिथावणीखोर भाषणे करणार नाही किंवा जमावाच्या भावना भडकवणारी किंवा त्यांना चिथावणी देणारी किंवा विविध गटांमध्ये धर्म, वंश, स्थान किंवा जन्म, निवास, भाषा, इत्यादी कारणावरून शत्रुत्व निर्माण करणारी किंवा तसा संभव असणारी भाषा वापरणार नाही अथवा अशा गटांमधील सलोखा राखण्यास बाधक ठरणारी किंवा सार्वजनिक शांतता बिघडवणारी अशी कोणतीही कृती कोणत्याही रीतीने करणार नाही. मी आणि इतर आयोजक, हमीपत्रातील मार्गदर्शक तत्त्वांचे अनुपालन करतील आणि पोलिसांना सर्व परिस्थितीत सहकार्य करतील.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App