नाशिक : मराठा आरक्षण आंदोलकांचे नेते मनोज जरांगे यांनी आज दसरा मेळाव्यात भाषण करताना मराठा समाजाला शासक आणि प्रशासक बनायला सांगितले. मराठा समाज शासक आणि प्रशासक बनला, तर नेत्यांपुढे हात पसरावे लागणार नाहीत. उलट नेतेच निवडून येण्यासाठी शासक आणि प्रशासक झालेल्या मराठा समाजापुढे हात पसरतील, असे मनोज जरांगे दसरा मेळाव्यात म्हणाले.
मनोज जरांगे यांचे हे आवाहन मराठा समाजासाठी “नवा मंत्र” असल्याचे मराठी माध्यमांनी बातम्यांमध्ये नमूद केले. जरांगे यांच्या भाषणाची मोठी चर्चा आणि प्रशंसा घडविली. जरांगे यांनी मराठा समाजासाठी क्रांतीची घोषणा दिली असेही सांगितले गेले.
जरांगे यांची मूळ घोषणा
पण जरांगे यांच्या आजच्या भाषणाची चर्चा आणि प्रशंसा घडविणारे मात्र 2024 ची मनोज जरांगे यांची मूळ घोषणा विसरून गेले. 2024 च्या लोकसभा निवडणुका नंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या त्या विधानसभा निवडणुकांच्या आधी मनोज जरांगे यांनी एक मोठी घोषणा केली होती ती घोषणा म्हणजे महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने राजकीय क्रांती घडवणारी घोषणा ठरू शकली असती ती म्हणजे मनोज जरांगे हे आपल्या विचारांचे सर्वसामान्य मराठ्यांमधून विधानसभेसाठी उमेदवार देणार होते. प्रस्थापित राजकीय पक्षांच्या नेत्यांपेक्षा सर्वसामान्य मराठा उमेदवारांना लोकांनी मते देऊन विधानसभेत पाठवावे तेच आपले मराठा आरक्षणाचे काम करतील, असे मनोज जरांगे त्यावेळी म्हणाले होते.
– प्रस्थापित पक्षांना हादरा
मनोज जरांगे यांच्या घोषणेमुळे त्यावेळी सगळ्याच प्रस्थापित राजकीय पक्षांच्या नेत्यांना मोठा धक्का बसला होता कारण मनोज जरांगे हे सर्वसामान्य घरातले तरुण मराठी उमेदवार देणार म्हटल्याबरोबर अनेक प्रस्थापित नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली होती. मनोज जरांगे यांनी दिलेले उमेदवार खरंच निवडून आले तर आपले राजकीय अस्तित्व पूर्ण धोक्यात येईल याची जाणीव त्यांना झाली होती.
मनोज जरांगे यांनी सुद्धा उमेदवार निवडीच्या दृष्टीने त्यावेळी अंतरवाली सराटी मध्ये बऱ्याच बैठका घेतल्या. त्याच्या सर्वत्र बातम्या देखील मोठमोठ्या प्रसिद्ध झाल्या. मनोज जरांगे आज उमेदवार यादी जाहीर करणार उद्या उमेदवार यादी जाहीर करणार ती टप्प्याटप्प्याने उमेदवार देऊन प्रस्थापित नेत्यांना हादरणार अशा बातम्यांनी त्यावेळी प्रसार माध्यमे भरली होती. पण प्रत्यक्षात विधानसभा निवडणुकीमध्ये असे काहीही घडले नाही. मनोज जरांगे यांनी आयत्या वेळेला उमेदवारच दिले नाहीत. या सगळ्या मागे शरद पवार असल्याचे त्यावेळी बोलले गेले होते. कारण मनोज जरांगे यांनी जर सर्वसामान्य घरांमध्ये मराठा उमेदवार दिले असते, तर त्याचा सर्वाधिक फटका दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला बसला असता, अशा अटकळी मराठी माध्यमांनी बांधल्या होत्या.
– खरंच उमेदवार दिले असते तर…
प्रत्यक्ष निवडणूक निकालामध्ये नेमके तेच चित्र दिसले. पण ते मनोज जरांगे यांच्या मराठा उमेदवारांमुळे निर्माण झालेले चित्र नव्हते, तर महायुतीने पूर्ण तयारीनिशी निवडणूक रण मैदान मारल्याचे ते चित्र होते. त्यावेळी खरंच जर मनोज जरांगे यांनी उमेदवार केले असते तर ते आज दसरा मेळाव्यास म्हटल्याप्रमाणे त्यांच्या विचारांचे मराठा उमेदवार जिंकून येऊन शासक आणि प्रशासक बनले असते मग त्यासाठी मनोज जरांगे यांना दसरा मेळाव्यात मराठा समाजाला शासक आणि प्रशासक बना, असे आवाहन करावे लागले नसते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App