Manoj Jarange मराठा आंदोलनाचे दोन्ही आक्रमक शिलेदार; पण प्रत्यक्ष निवडणूक लढण्यापासून माघार!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Manoj jarange  मराठा आरक्षण आंदोलनाचे दोन्ही आक्रमक शिलेदार, पण प्रत्यक्ष निवडणूक लढण्यापासून मात्र माघार!!, अशी अवस्था दोन बड्या नेत्यांची झाली आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे आणि छत्रपती संभाजीराजे हे दोघेही प्रत्यक्ष विधानसभा निवडणूक लढविण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे समोर आले आहे. Manoj jarange

मराठा आरक्षण आंदोलनाचे अनेक शिलेदार निवडणुकीच्या मैदानात असतील, ते प्रत्यक्ष निवडणुका लढवतील. त्यातल्या अनेकांनी फॉर्म भरले आहेत. त्यापैकी प्रत्येक मतदारसंघाचे सर्वेक्षण करून एकच उमेदवार देऊ, असे मनोज जरांगे यांनी अंतर्वली सराटीतून अनेकदा जाहीर केले. उमेदवार माघारीच्या अंतिम दिवशी आमचे चित्र स्पष्ट करू. मराठा + मुस्लिम आणि दलित असे एकत्र कॉम्बिनेशन जमवून महायुतीला टक्कर देऊ. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रभावाखालचे सरकार घालवू, असे मनोज जरांगे म्हणाले.

परंतु स्वतः कुठल्याही विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याला मात्र मनोज जरांगे यांनी नकार दिला. आपण स्वार्थी नाही. आपण फक्त समाजासाठी लढतो. समाजाची मुले मोठी करण्यासाठी राजकारणात पडलो. आरक्षण मिळाले असते, तर राजकारणातही पडलो नसतो, असा खुलासा मनोज जरांगे यांनी केला. याचा अर्थ प्रत्यक्ष स्वतः कुठल्याही एका विधानसभा निवडणूक लढवायला त्यांनी नकार दिला.


Eknath Shinde Shiv Sena विधानसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर!


संभाजीराजे देखील उतरायची शक्यता कमी

दुसरीकडे मराठा आरक्षणासाठीच संघर्ष करणारे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सुरुवातीला विधानसभा निवडणूक लढवायची तयारी केली होती. त्यासाठी त्यांनी स्वराज्य पक्षाची अधिकृत नोंदणी करून पक्षाला चिन्ह देखील मिळवले. त्यांनी स्वराज्य पक्ष परिवर्तन महाशक्ती नावाच्या तिसऱ्या आघाडीत सामील केला. परंतु स्वतः कुठल्या विधानसभा मतदारसंघात उभे राहण्याबद्दल त्यांचा अद्याप निर्णय झालेला नाही. किंबहुना संभाजीराजे यांनी सुरुवातीला कोल्हापूर मधून आणि नंतर नाशिक मधून विधानसभा निवडणूक लढवायची तयारी चालवली होती. पण परिवर्तन महाशक्तीच्या प्रचारासाठी राज्यभर फिरायचे असल्याने एखाद्या मतदारसंघात अडकून पडलो, तर परिवर्तन महाशक्तीच्या प्रचारासाठी वेळ देता येणार नाही. त्यामुळे सध्या ही अडचण असून प्रत्यक्ष विधानसभा निवडणूक लढवणार की नाही याबाबत उत्तर देता येत नसल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. याचा अर्थ संभाजीराजे हे देखील स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता कमी असल्याचेच समोर आले.

परिवर्तन महाशक्तीतून बच्चू कडू, वामनराव चटप, सुभाष साबणे, अंकुश कदम, माधव देवसरकर, गोविंदराव भवर, अनिल चौधरी गणेश निंबाळकर यांच्या उमेदवाऱ्या आधीच जाहीर झाल्या असून त्यापैकी प्रत्येकाने अर्ज दाखल केले आहेत. मात्र, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर समान भूमिका असणारे, त्याचबरोबर अत्यंत आक्रमकपणे तो मुद्दा मांडणारे दोन नेते मनोज जरांगे आणि संभाजीराजे हे मात्र स्वतः कुठल्या तरी एकाच मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या मैदानात नसतील, हे उघड झाले आहे.

Manoj jarange and sambhjiraje will not contest maharashtra assembly elections

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात