विशेष प्रतिनिधी
मुंबई : उच्च न्यायालयाने मराठा आंदाेलक मनाेज जरांगे यांना पाेलीसांच्या परवानगीशिवाय आझाद मैदानात आंदाेलन करण्यास परवानगी नाकारली हाेती. मात्र, त्यानंतर पाेलीसांनी त्यांना एक दिवस आंदाेलनाची परवानगी दिली. मात्र, आता मुंबईत दाखल झाल्यावर जरांगे यांनी अडेलतट्टूपणाची भूमिका घेतली आहे. आझाद मैदानातून उठणार नसल्याचे म्हटले आहे.
जालन्यातील आंतरवाली सराटीहून निघाल्यानंतर अखेर मनोज जरांगे मुंबईत दाखल झाले. ते येण्यापूर्वीच त्यांचे हजारो समर्थक आझाद मैदानावर जमले होते. यावेळी बाेलताना जरांगे म्हणाले, मुख्यमंत्र्यांना एकच विनंती आहे की आज कोट्यावधी लोक मुंबईत आणली आहेत. आम्हाला माज मस्ती नाहीय आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा आणि गोरगरीब मराठ्यांचा सामना करा. हे मराठे मरेपर्यंत तुम्हाला विसरणार नाहीत.
सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून घराघरातून मराठ्यांनी मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायचे ठरवलं होतं. आता आपल्याला सरकारने सहकार्य केलं आहे. त्याबद्दल आपण सरकारचे कौतुक केले. त्यामुळे आता तुम्हालाही सहकार्य करायचे आहे. पुढील दोन तासांत मुंबई मोकळी करा. कोणीही जाळपोळ, दगडफेक करायची नाही.
मराठ्यांची मान खाली जाईल असं एकही पाऊल कुणी उचलायचं नाही. डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून उठायचं नाही. आपण समाजाला न्याय देण्यासाठी इथे आलो आहोत. आपण शिकलो नाही, आपण लोकांच्या बुद्धीने चाललो. त्यामुळे सत्तर वर्षे वाटोळे झालं हे मराठ्यांनी विसरू नका, असे आवाहन जरांगे यांनी केले.
पोलिसांनी मनोज जरांगे यांना आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. यासाठी त्यांनी त्यांना 5 हजार आंदोलक सोबत ठेवण्याचेही निर्देश दिलेत. त्यावर तोडगा म्हणून जरांगे यांनी आळीपाळीने आंदोलकांना आझाद मैदानावर येण्याची सूचना केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App