इतिहास सांगतो, मनोहर जोशीजींना त्यांच्या जावयावर भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते. आज उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या मेव्हण्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. हाच नियम इथे लागू होतो का? की शिवसैनिकाचे नियम वेगळे आहेत?”, असा सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. Manohar Joshi had to resign, now … why different rules for Shiv Sainiks, Nitesh Rane’s question
विशेष प्रतिनिधी
मुंबई : इतिहास सांगतो, मनोहर जोशीजींना त्यांच्या जावयावर भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते. आज उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या मेव्हण्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. हाच नियम इथे लागू होतो का? की शिवसैनिकाचे नियम वेगळे आहेत?”, असा सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
ईडीने पुष्पक ग्रुपच्या ६ कोटी ४५ लाख रुपयांच्या मालमत्तेची चौकशी केली आहे. त्यात रश्मी ठाकरे यांचे सख्खे भाऊ तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील नीलंबरी प्रकल्पातील ११ सदनिकांना टाळे ठोकण्यात आले आहे. यावरूनच भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे
नितेश राणे म्हणाले की, थेट मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांवर ही कारवाई झाली आहे. आता मुख्यमंत्री कशासाठी थांबलेत, त्यांनी राजीनामा द्यावा. आतापर्यंत आम्ही सगळीकडे त्यांचे नाव ऐकत होतो. ते आता सिद्ध झाले आहे. तो पैसा काही त्यांच्या घरापर्यंत मर्यादित राहिलेला नाही. ते भुयारी गटार थेट मातोश्रीपर्यंत जाते. त्यामुळे आता मातोश्रीने उत्तर द्यायला हवे, मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला उत्तर द्यावे. सचिन वाझे आणि हे पैसे कुठे कुठे फिरत आहेत हे आता समोर आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नैतिक दृष्टीकोनातून राजीनामा द्यावा.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App