विशेष प्रतिनिधी
मुंबई : Manikrao Kokate राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सदनिका घोटाळा प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर हा महत्त्वपूर्ण टप्पा समोर आला असून आता माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे.Manikrao Kokate
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते काढण्याची शिफारस राज्यपालांकडे केली होती. त्यानंतर आता कोकाटे यांचे खाते हे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे देण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आता हे खाते कोणाकडे दिले जाणार याचा निर्णय हा अजित पवार यांच्याकडे असणार आहे. त्यामुळे क्रीडा खाते कोणाकडे दिले जाणार याकडे देखील सर्वांचे लक्ष असणार आहे.Manikrao Kokate
नाशिक सत्र न्यायालयाने मंगळवारी सदनिका घोटाळाप्रकरणात माणिकराव कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली होती. त्यामुळे कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली होती. कोकाटे यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, त्याची सुनावणी शुक्रवारी होणार आहे, त्यापूर्वीच माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. ऐन निवडणुकीत कोकाटे यांनी राजीनामा दिल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.Manikrao Kokate
माणिकराव कोकाटे हे वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी विधीमंडळाच्या सभागृहात चक्क मोबाईलवर ‘रम्मी’ गेम खेळल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची जोरदार मागणी लावून धरली होती. मात्र, त्यावेळी त्यांचा राजीनामा न घेता केवळ खातेबदल करण्यात आला होता, ज्यामुळे त्यांना आपले तत्कालीन कृषी मंत्रिपद गमवावे लागले होते.
सरकारच्या प्रतिमेच्या दृष्टीने योग्य निर्णय – प्रवीण दरेकर
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हटले, मला वाटते की कोर्टाने निर्णय दिल्यानंतर सरकारने अशा प्रकारचा निर्णय घेतला असेल तर सरकारच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेच्या दृष्टीने हे त्याठिकाणी योग्य आहे. आता टप्प्या टप्प्याने सरकार भूमिका घेईल. सरकारचे अभिनंदन केले पाहिजे कारण लोकांच्या मनात किंवा कोर्टाने एखादा निर्णय घेतल्यावर तात्काळ दखल घेतली आहे.
मुख्यमंत्र्यांनी माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचे काम केले – अंबादास दानवे
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी फार मोठे असे काही काम केले नाही. त्यांनी माणिकराव कोकाटे यांना वाचवण्याचे प्रयत्न करत आहेत. ज्या वैधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीला शिक्षा होते तेव्हा त्याच्याकडील पद तातडीने काढावे लागते. राहुल गांधी यांना देखील मागच्या वेळी अशीच शिक्षा सुनावली होती आणि त्यांचे 24 तासांत लोकसभेचे सदस्यपद काढून टाकले होते.
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा म्हणजे नाईलाजाने घेतलेला निर्णय – रोहित पवार
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदारे रोहित पवार यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मंत्री कोकाटे यांचा राजीनामा म्हणजे निसटण्याचे सगळे मार्ग संपल्याने नाईलाजाने घेतलेला हा निर्णय आहे…! वास्तविक नैतिकतेच्या आधारावर कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा ठोठावली तेंव्हाच त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता किंवा सरकारने तरी त्यांचा राजीनामा घेऊन सरकार खऱ्या अर्थाने ‘वेगवान’ आहे हे दाखवून द्यायला हवं होतं. यामुळं किमान कायद्याचा सन्मान तरी राखला गेला असता आणि ‘कायदा व न्याय हे सर्वांसाठी समान आहे,’ असा चांगला संदेशही समाजात गेला असता. पण तशी अपेक्षा माणिकराव कोकाटे यांच्याकडून करणंच चुकीचं आहे! असो! या राजीनाम्यातून अनेकजण धडा घेतील, ही अपेक्षा! आम्ही मात्र मंत्री शिरसाठ यांच्याही विकेटची वाट पहात आहोत!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App