प्रतिनिधी
मुंबई : Chief Minister नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रसूतीसाठी गेलेल्या महिलेस रुग्णालयात दाखल करण्यासाठी तब्बल १० लाख रुपये मागण्यात आल्याचा प्रकार घडला. त्यानंतर महिलेचा दुसऱ्या रुग्णालयात प्रसूती झाल्यावर दुर्दैवी मृत्यूनंतर निर्माण झालेल्या समाजातील संतापाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे रुग्णालयात इमर्जन्सी कक्षात दाखल होणाऱ्या कोणत्याही रुग्णांकडून डिलिव्हरीसाठी येणाऱ्या महिलांकडून तसेच बालरोग विभागात येणाऱ्या रुग्णांकडून डिपॉझिट रक्कम घेतली जाणार नाही, असा ठराव एकमताने करण्यात आला आहे. शनिवारपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.Chief Minister
रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी पत्राद्वारे याबाबतची माहिती दिली. त्यांनी काल घडलेल्या घटनेबद्दल तीव्र खेद व्यक्त करत तो दीनानाथ रुग्णालयाच्या इतिहासातील एक अत्यंत दु:खद व सुन्न करणारा दिवस असल्याची भावना व्यक्त केली. डॉ. केळकर म्हणाले, या घटनेतील सत्य शासकीय चौकशीद्वारे उघड होईलच, मात्र यानिमित्ताने सुरू झालेला असंवेदनशीलतेचा वाद संपवण्याची ही सुरुवात आहे. नागरिकांनी आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी याची नोंद घ्यावी, असे त्यांनी सांगितले आहे.
दोषींवर कारवाई होणारच : मुख्यमंत्री
तनिषा ऊर्फ ईश्वरी भिसे यांच्या कुटुंबीयांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बालेवाडी येथे भेट घेतली. भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले. आमदार अमित गोरखे भिसे यांच्या कुटुंबीयांसह उपस्थित होते. शासनातर्फे नेमण्यात आलेल्या चौकशी समितीच्या सदस्यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. फडणवीस म्हणाले, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेला प्रकार असंवेदनशील आहे, असेही त्यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App