किरीट सोमय्यांनी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सिराज मोहम्मद हारून मेमन बाबत दिली मोठी बातमी Malegaon Vote jihad case
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मालेगाव व्होट जिहाद प्रकरणातील मुख्य सूत्रधार सिराज मोहम्मद हारून मेमनबाबत मोठा खुलासा झाला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी पर्दाफाश करत सांगितले की, सिराज अहमदची दुबईत ५ बँक खाती आहेत आणि यातून १०० कोटी रुपयांचे व्यवहार होतात. Malegaon Vote jihad case
याशिवाय किरीट सोमय्यांनी माहिती सांगितले की, भारतातील २१ राज्यांतील २०१ बँक खात्यांतून २५२ कोटी रुपये मालेगावला आणण्यात आले. यातील ३७ कोटी ८८ लाख रुपये सिराजचा मित्र सलमान सलीम मिर्झा याच्या खात्यात जमा करण्यात आले. तर २०० कोटी व्होट जिहादच्या एजंटांना दिले. याशिवाय या पैशांचा वापर बांगलादेशी रोहिंग्यासाठीही केला जात असल्याचा आरोप केला गेला आहे.
G-20 summit : G-20 शिखर परिषदेत मोदी म्हणाले – ‘ग्लोबल साउथचा आवाज बुलंद करावा लागेल’
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदान घडवावे यासाठी व्होट जिहाद करून हवाला रॅकेट मार्फत तब्बल 125 कोटी रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये जमा करणाऱ्या मास्टरमाईंड सिराज मोहम्मदला आणि बँकेचा व्यवस्थापक दीपक निकम या दोघांना पोलिसांनी धडक कारवाई करून मालेगावातून अटक केलेली आहे.
त्याचबरोबर सक्तवसुली संचालनालय अर्थात ED ने मालेगाव नाशिक-मुंबई-सुरत-अहमदाबाद इथल्या वेगवेगळ्या 20 लोकेशन्स वर छापे घातले आहेत. यातून मोठी धक्कादायक माहिती समोर येण्याची दाट शक्यता आहे. व्होट जिहादसाठी केवळ देशातल्याच नव्हे, तर देशाबाहेरच्या देखील घातपाती शक्ती कार्यरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ED अधिकाऱ्यांनी छापे घालून कठोर कारवाईला सुरुवात केली. या कारवाईचे तपशील टप्प्याटप्प्याने ED जाहीर करणार आहे
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App