विशेष प्रतिनिधी
बीड : Majalgaon बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली असून तपास सुरू आहे. तसेच या प्रकरणातील तीन आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. तसेच जे कोणी या आरोपींची माहिती देईल त्याला बक्षीस देण्यात येईल, असे देखील पोलिसांनी जाहीर केले आहे. या सगळ्यात देशमुख कुटुंबीयांना माजलगाव तालुक्यातील नागरिकांनी मोठी आर्थिक मदत केली आहे. 44 लाखांच्या जवळपास ही रक्कम जमा करण्यात आली असून देशमुख कुटुंबीयांना आमदार प्रकाश सोळंके यांच्यामार्फत ही रक्कम देण्यात आली आहे.Majalgaon
संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी माजलगावकरांनी पुढाकार घेत आर्थिक मदत केली आहे. संपूर्ण माजलगाव तालुक्यातून नागरिकांनी हा फंड गोळा केला असून हा निधी आमदार प्रकाश सोळंके यांच्या उपस्थितीत सरपंच देशमुख यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला आहे. 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. कुटुंबातील कर्ता-धर्ता गेल्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. त्यामुळे त्यांना आधार म्हणून नागरिकांनी ही मदत केली आहे.
माजलगाव शहरात मदत फेरी काढण्यात आली. यावेळी शहरातील व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक, सर्वसामान्य जनतेने आपल्याला जमतील तेवढे पैसे देत मदतीचा हात दिला आहे. या मदत फेरीतून जवळपास 44,22,483 लाख रुपये जमा झाले होते. माजलगावकरांनी हा मनाचा मोठेपणा दाखवला असून यामुळे देशमुख कुटुंबीयांना नक्कीच मोठा आधार मिळाला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, या प्रकरणाचा तपास अद्याप पाहिजे तेवढ्या सतर्कतेने होत नाही. ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देणार आहे. तसेच उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे देखील आमदार सोळंके यांनी सांगितले आहे. पुढे बोलताना आमदार सोळंके म्हणाले, देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत आणि या प्रकरणाचा शेवट लागेपर्यंत आपण सर्वजण सतर्क राहू. मुख्यमंत्र्यांनी सीआयडीकडे तपास, एसआयटी, न्यायालयीन चौकशी लावल्याने आरोपी निश्चित पकडले जातील, त्यांना फासावर लटकवले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर मागील पाच वर्षात जिल्ह्यात वाढलेल्या गुंडगिरी, अवैध धंदे यातून मिळणाऱ्या प्रचंड पैशामुळे काही राक्षसी प्रवृत्तीचे लोक निर्माण झाले, त्यांना मोकाट रान सुटले होते. त्यांचा स्व. संतोष देशमुख यांनी धाडसाने मुकाबला केला. त्यांना प्राणाची आहुती द्यावी लागली. ही प्रवृत्ती मोडीत काढून सर्वसामान्यांना शांततेत जगता यावे, व्यवसाय करता आले पाहिजे, जिल्ह्यात प्रगतीच्या दृष्टीने येणाऱ्या प्रकल्पांना त्रास देणे बंद झाले पाहिजे. अशा प्रकल्पामुळे सुशिक्षित बेरोजगार, हाताला काम देण्याच्या भावनेने या प्रकल्पाकडे बघितले पाहिजे. जातीविरुद्ध भावना न आणता गुंडगिरीचा समूळपणे नष्ट करण्याच्या दृष्टीने देशमुख हत्या प्रकरणाकडे बघावे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App