Devendra Fadnavis दर्ग्याच्या आडून नाशिक मध्ये मोठी दंगल घडवण्याचे कारस्थान होते, पण…; मुख्यमंत्री फडणवीसांचा गौप्यस्फोट

Devendra Fadnavis

वृत्तसंस्था

छत्रपती संभाजीनगर : नाशिक मधला बेकायदा सातपीर दर्गा काढून टाकण्याच्या मुद्द्यावरून शहरात मोठी दंगल घडविण्याचे कारस्थान होते पण पोलिसांनी कठोर कारवाई करून ते हाणून पाडले, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजी नगर मधून केला.

दोनच दिवसांपूर्वी नाशिक मधला बेकायला सातपीर दर्गा कोर्टाच्या आदेशानंतर नाशिक महापालिका आणि पोलीस प्रशासनाने एकत्र येऊन उद्ध्वस्त केला. पण त्यापूर्वी मध्यरात्री 400 पेक्षा अधिक धर्मांध समाजकंटकांनी पोलिसांवर दगडफेक करून जाळपोळ केली. समाजकंटकांच्या दगडफेकीत ३१ पोलीस जखमी झाले. पण पोलिसांनी वेळीच बळाचा वापर करून दंगल आटोक्यात आणली. AIMIM चा शहराध्यक्ष मेहबूब शेखला अटक केली. सुमारे १११० संशयितांच्या विरोधात गुन्हे दाखल केले.

या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी धर्मांध समाजकंटकांचा नेमका काय इरादा होता??, यावर प्रकाश टाकला. Waqf सुधारणा कायद्याला विरोध करण्याच्या इराद्याने समाजकंटकांना नाशिक मध्ये मोठे दंगल घडवायचीच होती. त्यांनी त्याचे प्लॅनिंग पूर्ण करत आणले होते. सातपीर दर्गा पाडण्याच्या निमित्ताने पोलिसांवर दगडफेक करून समाजकंटकांनी दंगलीची सुरुवात केलीच होती, पण पोलिसांनी वेळीच कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांचे कारस्थान उधळून लावले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

वास्तविक बेकायदा सातपीर दर्गा काढून टाकण्याचे आदेश कोर्टाने दिले होते‌. संबंधितांनी स्वतःहून तो दर्गा काढून टाकण्याचे मान्य केले होते. तशी कारवाई देखील सुरू केली होती. पण धर्मांध समाजकंटकांना दंगल घडवायची असल्यामुळे त्यांनी दर्ग्यावरील कारवाईचे राजकीय भांडवल करून कारस्थान रचले होते, पण पोलिसांनी त्यावरून पाडले, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Mahrashtra CM Devendra Fadnavis says, “A very well-planned effort was made to incite riots in Nashik.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात