Mahayuti महायुतीचा मैत्रीपूर्ण लढतीचा पुणे पॅटर्न, खडकवासल्यात दत्ता धनकवडे तर वडगाव शेरीत जगदीश मुळीक लढणार

Mahayuti

विशेष प्रतिनिधी

पुणे : Mahayuti  पुण्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या खडकवासला आणि वडगाव शेरी या मतदारसंघात महायुतीकडून मैत्रीपूर्ण लढतीचा पुणे पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता आहे. खडकवासला मतदारसंघातून अजित पवार गटाचे दत्ता धनकवडे हे भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांच्या विरोधात लढणार आहेत. वडगाव शेरीतून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक लढत देणार आहेत.

खडकवासला आणि वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघांमध्ये आता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने खडकवासला विधानसभा मतदारसंघात असल्यास उमेदवार देण्याची तयारी केल्याने भाजप देखील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार देण्याची शक्यता आहे. Mahayuti

पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघ हे भाजपाच्या वाट्याला तर दोन विधानसभा मतदारसंघ अजित दादांच्या राष्ट्रवादीला मिळाले आहेत. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यासाठी भाजप सुरुवातीपासून आग्रही होता. मात्र या ठिकाणी विद्यमान आमदार सुनील टिंगरे याना पुन्हा एकदा राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या भाजपच्या जगदीश मुळीक यांनी या ठिकाणी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू ठेवली असल्याचं बोललं जातंय. पक्षाने अधिकृत एबी फॉर्म दिल्यास आपण निवडणूक लढणार असल्याचं जगदीश मुळीक यांनी सांगितले आहे.

खडकवासला विधानसभा मतदारसंघात पक्षांतर्गत विरोध डावलून भाजपने पुन्हा एकदा भीमराव तापकीर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. आता माजी महापौर आणि अजित पवार गटात असलेले दत्ता धनकवडे यांनी आपण खडकवासला विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे जाहीर केले आहे. Mahayuti

आपण राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. त्यांना एबी फॉर्म देखील देण्यात आल्याचं बोललं जात आहे. आता हे उमेदवारी अर्ज फक्त दबाव निर्माण करण्यासाठी दाखल करण्यात आले आहेत की खरच मैत्रीपूर्ण लढत होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Mahayuti khadakwasla Datta Dhankawade and Wadgaon sheri Sunil Tingre

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात