येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, अस विधानही फडणवीसांनी केलं.
विशेष प्रतिनिधी
गंगापूर उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन व कोनशिलाचे अनावरण गुरुवारी गंगापूर, छत्रपती संभाजीनगर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. या कार्यक्रमात कामगार कल्याण पेटी, आयुष्मान भारत कार्ड, उज्ज्वला गॅस, महिला आरोग्य किट, दिव्यांग साहित्य व क्रीडा साहित्याचे लाभर्थ्यांना वाटप केले. यावेळी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, मंत्री अतुल सावे, आमदार प्रशांत बंब आणि इतर उपस्थित होते.Mahayuti government will erase the identity of Marathwada as droughtstricken Said devndra Fadanvis
यावेळी फडणवीसांनी, मराठवाड्याची दुष्काळग्रस्त ही ओळख मिटविण्यासाठी आम्ही 2015 पासून कार्यरत आहोत. वॉटर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील दुष्काळ कायमस्वरूपी संपवायचा असून येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही. असे आश्वासित केले.
तसेच सांगितले की, जलजीवन मिशनच्या कामाचे भूमिपूजन 30 जून रोजी करून 1,078 रुपये कोटींचे काम गंगापूर येथे सुरु केले होते, त्याचे 25 टक्के काम पूर्ण झाले. या योजनेचा लाभ 40 गावांना होणार असून 25,000 एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे.शेततळ्याला ठिबक सिंचनातून थेट बांधापर्यंत पाणी पोहोचविणारी जलजीवन मिशन ही एकमेव योजना आहे. या योजनेला लागणाऱ्या विजेसाठी आम्ही सौरऊर्जा प्रकल्प मंजूर करू. मंत्रिमंडळ बैठकीत ₹18,500 कोटींचे प्रकल्प मराठवाड्यासाठी मंजूर केले. गेल्या दीड वर्षात 5,000 कोटी मराठवाड्यासाठी मंजूर केले.
याशिवाय स्वप्नवत वाटणारे कृष्णा खोऱ्यातील पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी 11,000 कोटींची कृष्णा मराठवाडा योजना मंजूर केल्याने येत्या दीड वर्षात ते पाणी मराठवाड्याला मिळणार. नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पातून गंगापूर वैजापूर येथील 43,000 हेक्टर ला लाभ मिळेल अशी योजना तयार केली. निम्न दुधना प्रकल्पातून जालना जिल्ह्यातील 2 गावांना व परभणी जिल्ह्यातील 116 गावांना 34,438 हेक्टर सिंचनाचा लाभ मिळेल. गेल्या दीड वर्षात मराठवाड्यातील प्रकल्पांना ₹31,751 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली त्यातून मराठवाड्यातील जवळपास 5 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. असंही फडणवीसांनी सांगितलं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App