नाशिक : पुण्यामध्ये महायुती मधले संबंध पुरते खारट झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेकरांना निरोप पाठविला, महायुती मिठाचा खडा पडता कामा नये!! पण तोपर्यंत धंगेकरांना महायुतीत काय करायचे होते, ते करून झाले होते.Mahayuti and the Dhangekars soured in Pune, Eknath Shinde’s farewell to Dhangakar
पुण्यातल्या जैन बोर्डच्या हॉस्टेलच्या विक्रीवरून मोठा राजकीय गदारोळ झाला. पुण्यामध्ये भाजपला हवे असणारे मुरलीधर मोहोळ यांचे नेतृत्व प्रस्थापित होण्यापूर्वीच ते उखडण्याचा कार्यक्रम लागला. त्यात रवींद्र धंगेकर यांनी पुढाकार घेतला त्यांना अनेकांनी मोठा इंधन पुरवठा केला ज्यांना मुरलीधर मोहोळ यांचे नेतृत्व पुण्यात प्रस्थापित होऊ द्यायचे नव्हते, अशा नेत्यांनी सुद्धा रवींद्र धंगेकर यांच्या नथीतून तीर मारले. कारण महापालिका निवडणुकीत भाजपने स्वबळावर इतरांना धोबीपछाड देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पहिला सुरुंग लागला. महायुतीच्या सत्तेच्या वळचणीला राहून पुण्यातली सत्ता मिळणार नसेल तर भाजपला ती सुखासुखी मिळवून द्यायची नाही यासाठी मोठा डाव खेळला गेला. यातूनच जैन बोर्डाच्या होस्टेलच्या विक्रीच्या मुद्द्याला जोरदार हवा देण्यात आली.
रवींद्र धंगेकर यांनी वैयक्तिक पातळीवर तो विषय उचलून धरला, तरी त्यांना बऱ्याच ठिकाणहून राजकीय इंधनपुरवठा झाला. त्यातून मुरलीधर मोहोळ यांचे नेतृत्व कमकुवत करायचा प्रयत्न झाला. मुरलीधर मोहोळ यांच्याविरुद्ध अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना फारसे काही करता आले नाही म्हणून धंगेकर यांना हाताशी धरण्यात आले.
– अजितदादांना हवेत धंगेकर
धंगेकरांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीचे काम सोपे करायचा प्रयत्न केला. पण त्यामध्ये त्यांना विशिष्ट मर्यादेपलीकडे यश आले नाही. कारण मुरलीधर मोहोळ यांच्या मागे भाजपचे श्रेष्ठी ठामपणे उभे राहिल्यानंतर महायुतीतल्या बाकीच्या दोन घटक पक्षांच्या मुख्य नेत्यांना थंड पडणे भाग पडले. म्हणून एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेरांना जो पाठवायचा तो निरोप पाठवला महायुतीत कुठल्याही कार्यकर्त्यामुळे मिठाचा खडा पडता कामा नये, असा निरोप धंगेकरांना पाठविल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. पण तोपर्यंत महायुतीतले पुण्यातले संबंध पुरते खारट झाले होते.
– भाजपने लावली कात्री
पण एकनाथ शिंदे यांनी निरोप पाठवून सुद्धा धंगेकर कितपत शांत बसतील??, याविषयी शंका आहे. कारण धंगेकर स्वतःच्या सोयीनुसार वेगवेगळ्या पक्षांमध्ये फिरून आलेत. त्यांची कुणाही एका नेत्यावर किंवा पक्षावर निष्ठा नाही. त्यामुळे स्वतःचा अजेंडा राबविण्यासाठी आणि स्वतःचे राजकारण पुढे धकून नेण्यासाठी त्यांना अजित पवारांची राष्ट्रवादी उपयुक्त ठरणार असेल, तर पुण्यातल्या स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने धंगेकर अजित पवारांची साथ दिल्याशिवाय थांबणार नाही. अर्थात असे करून देखील धंगेकर आणि अजित पवार या जोडगोळीला पुण्यात मर्यादेपेक्षा जास्त यश मिळण्याची शक्यता नाही. कारण दोघांची ताकद मुळातच मर्यादित आहे. त्यातच भाजप सारख्या सत्ताधारी पक्षाने त्यांना पुरती कात्री लावली आहे
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App