Mahavikas Aghadi : ओबीसीतून मराठा आरक्षणावर महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात चकार शब्द नाही; जरांगे आंदोलनाच्या, पण बचावात्मक पवित्र्यात!!

Mahavikas Aghad

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Mahavikas Aghadi काँग्रेस + शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात बाकीची भरघोस आश्वासने दिली असली, तरी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यावर त्यात चकार शब्द लिहिलेला नाही. मनोज जरांगे यांची तर नेमकी तीच मागणी आहे परंतु महाविकास आघाडी जाहीरनाम्यावर विचारल्यानंतर मनोज जरांगे यांनी आंदोलनाची भाषा वापरली पण याला पाठ त्याला पाड अशी कुठलीही भाषा न वापरता ते बचावात्मक पवित्र्यात गेल्याचेच दिसले.Mahavikas Aghadi



मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये फायदा झाला त्यानंतर गेल्या चार महिन्यात मनोज जरांगे यांनी अनेकदा भूमिका बदलल्या. सुरुवातीला निवडणूक लढवण्याची भाषा करून थेट मुख्यमंत्री पदाला गवसणी घालायचा आव आणला, पण ऐन वेळेला निवडणुकीच्या मैदानात उतरण्याऐवजी त्यांनी माघार घेणे पसंत केले. यातून त्यांच्या विश्वासार्हतेला मोठा धक्का बसला.

महाविकास आघाडीने मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा लोकसभा निवडणुकीत फायदा जरूर घेतला, पण ओबीसींमधून मराठ्यांना आरक्षण द्या, या मागणीवर मात्र जाहीरनाम्यात चकार शब्द लिहिलेला नाही. त्यावर मनोज जरांगे यांनी सरकार कोणाचेही येऊ द्यात, आम्हाला आंदोलन करावेच लागेल. आम्ही आता सामूहिक उपोषण करू, पण मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ अशी भाषा वापरली पण त्यामध्ये त्यांनी याला पाडा, त्याला पाडा, या भाषेचे मिश्रण केले नाही. ती भाषा त्यांनी सकाळच्या पत्रकार परिषदेत स्वतंत्र वापरली.

Mahavikas Aghadi’s manifesto on Maratha reservation from OBC does not contain a single word; Jarange movement, but in a defensive posture!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात