केंद्राच्या शंभर कोटी लसीकरणावर संशय घेणाऱ्या महाविकास आघाडीचे दहा कोटी लसीकरणावर सेलीब्रेशन

विशेष प्रतिनिधी

मुंबई : देशात शंभर कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केल्यावर केंद्र सरकारवर संशय व्यक्त करणाऱ्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने मात्र दहा कोटी लसीकरणाचे सेलीब्रेशन केले आहे.महाराष्ट्राने आज दहा कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचा टप्पा गाठला, अशी माहिती राज्याचे आरोग्यमत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.Mahavikas Aghadi, which is skeptical of Centre’s 100 crore vaccinations, celebrates 10 crore vaccinations

प्रत्येक जिल्ह्यात काम करणारे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमातूनच हे यश साध्य झाले. सर्वांचे अभिनंदन करतो, अशा भावनाही त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने संपूर्ण देशात मोफत लसीकरणाची सुविधा केली.



देशातील संपूर्ण लोकसंख्येला लसीकरणाचे लक्ष्य ठेवले. नुकतेच शंभर कोटी लसीकरणाचे लक्ष्य पूर्ण झाले आहे. मात्र, यावेळी राज्यातील महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी त्यावर संशय व्यक्त केला. मात्र, आता केंद्राकडूनच आलेल्या लसीचे वितरण केल्याबद्दल राज्य सरकार आपली पाठ थोपटून घेत आहे.

कोरोना लसीकरण झाल्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. मंगळवारी दिवसभरात राज्यात 982 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 27 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर 1 हजार 293 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

आता महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 66 लाख 19 हजार 329 वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत 1 लाख 40 हजार 430 जणांचा मृत्यू झाला असून 64 लाख 61 हजार 956 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या महाराष्ट्रात 13 हजार 311 सक्रीय रुग्ण आहेत.

Mahavikas Aghadi, which is skeptical of Centre’s 100 crore vaccinations, celebrates 10 crore vaccinations

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात