विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडीच्या जागावाटपात शरद पवारांनी टाकलेल्या 85 च्या खोड्यात अडकून पडण्याऐवजी काँग्रेसनेच ठाकरेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी यांना डबल डिजिट वर ढकलून दिले. काँग्रेसने 102, शिवसेनने 96, तर राष्ट्रवादीचे 87 जागांवर उमेदवार जाहीर केले, 5 जागांवर महाविकास आघाडीतल्या दोन पक्षांनी वेगवेगळी तिकिटे दिली. दोघांना तिकीट दिले. शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. कारण महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी 5 ठिकाणी दोन उमेदवार दिले आहेत.
शिवसेना ठाकरे गटाने 96 उमेदवारांनी एबी फॉर्मसह विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
जागा वाटपाचा फॉर्म्युला
शिवसेना UBT = 96 काँग्रेस = 102 राष्ट्रवादी SP = 87
या तीन पक्षांच्या मिळून 285 जागा होतात. यात 5 ठिकाणी दोन पक्षांनी एकमेकांविरोधात उमेदवार दिलेत.म्हणजे 280 जागांवर हे तीन पक्ष एकत्रितपणे लढणार आहेत. ऊर्वरीत 8 या जागा मित्र पक्षांसाठी सोडल्याचे दिसतंय.
महाविकास आघाडीमध्ये ज्या ठिकाणी दोन पक्षांनी अर्ज भरले आहेत
मिरज : शिवसेना ठाकरे गट -तानाजी सातपुते, काँग्रेस – मोहन वनखंडे
सांगोला : शिवसेना ठाकरे गट दीपक आबा साळुंखे, शेकाप – बाबासाहेब देशमुख
दक्षिण सोलापूर : काँग्रेस – दिलीप माने, शिवसेना ठाकरे गट – अमर पाटील
पंढरपूर : काँग्रेस – भागीरथ भालके , राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार – अनिल सावंत
परांडा : शिवसेना ठाकरे गट – रणजीत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार – राहुल मोटे
दिग्रस : शिवसेना ठाकरे गट – पवन जैस्वाल, काँग्रेस – माणिकराव ठाकरे
काँग्रेसने एबी फॉर्म न दिल्याने माने समर्थकांचा संताप
सोलापूर दक्षिणच्या जागेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अमर पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्याच जागेवर काँग्रेस नेते आणि माजी आमदार दिलीप माने इच्छुक होते. काँग्रेसच्या उमेदवार यादीत दिलीप माने यांचे नाव देखील आले होते. मात्र, दिलीप माने यांना काँग्रेसने एबी फॉर्म दिला नाही. दिलीप माने यांना काँग्रेसने एबी फॉर्म न दिल्याने माने समर्थकांचा मोठा संताप व्यक्त केला आहे. प्रणिती शिंदे आणि काँग्रेसने मोठा दगफटका केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App