येत्या 2 वर्षांत महाराष्ट्र गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर; देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी काही त्रुटी घालवाव्या लागतील, सवलती द्याव्या लागतील, आम्ही यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत, येत्या २ वर्षांत महाराष्ट्र पुन्हा परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आणू, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. Maharashtra to rank first in investment in next 2 years; Faith of Devendra Fadnavis

केंद्राचा २ हजार कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार 

केंद्राने महाराष्ट्रासाठी इलेक्ट्रॉनिक क्लस्टरची घोषणा केली आहे. हा २ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा प्रकल्प असणार आहे. याचा महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासासाठी फार फायदा होणार आहे, असे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी चांगले वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत, ते महाराष्ट्राची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत, ते जसे महाराष्ट्राची बदनामी करतील, तसे मी त्यांना उघडे पाडेन, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.


DEVENDRA FADANVIS : ती डायरी-‘मातोश्री’अन् 2 कोटी रुपयांचं गिफ्ट…देवेंद्र फडणवीस काय म्हणाले!


महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर

माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सोमवारी त्यासंदर्भात घोषणा केली. राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणातंर्गत महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात २ हजार कोटींची गुंतवणूक येणार असून, त्या माध्यमातून 5000 वर रोजगार निर्मिती होणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नशील होते. गेल्या 2 महिन्यांत अनेकदा दिल्लीत जाऊन त्यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. त्यानंतर दिल्लीतील अधिकारी पुण्यात येऊन गेले आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती. आता फडणवीसांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, दिवाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महाराष्ट्राला मिळालेले हे एक मोठे गिफ्ट आहे.

  •  297.11 एकर जागेवर हे क्लस्टर साकारणार
  •  492.85 कोटी रुपये खर्च केले जाणार
  •  207.98 कोटी रुपये हे केंद्र सरकार महाराष्ट्राला देणार
  •  आयएफबी रेफ्रिजरेशनचे काम सुरु, 450 कोटींची या एकट्या कंपनीची गुंतवणूक
  •  इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, सोलार पीव्ही मॅन्युफॅक्चरिंग, ई मोबिलिटी उत्पादक असे अनेक उद्योग राज्यात येणार

Maharashtra to rank first in investment in next 2 years; Faith of Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात