विशेष प्रतिनिधी
मुंबई : Maharashtra Govt त्रिभाषा सूत्रासंदर्भात राज्य सरकारचा नवा जीआर जारी करण्यात आला आहे. त्यानुसार ‘पुनर्विचारासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. पूर्वीचे 2 जीआर औपचारिकपणे रद्द करण्यात आले आहेत. नव्या जीआरमध्ये उल्लेख करण्यात आल्याप्रमाणे माशेलकरांच्या समितीने सादर केलेल्या अहवालाचा अभ्यास ही समिती करणार आहे. तसेच नवी समिती 3 महिन्यांत आपल्या शिफारसी सादर करेल.Maharashtra Government
राज्य सरकारने त्रिभाषा सूत्र संदर्भातील पूर्वीचे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यासंदर्भात नवा शासन आदेश(GR)जाहीर केला आहे. या संदर्भात 16 एप्रिल आणि 17 जून 2025 रोजी जारी झालेले शासन निर्णय आता रद्द झाले आहेत. या जीआरमध्ये मराठी माध्यमातील शाळांमध्ये पहिल्या वर्गापासून तिसरी भाषा म्हणून हिंदी अनिवार्य केली होती, ज्यावर राज्यभर जोरदार विरोध झाला होता. त्यानंतर हे जीआर रद्द करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. Maharashtra Govt
या दोन्ही निर्णयांना रद्द करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारे समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. या वेळी फडणवीस यांनी म्हटले की, मराठी ही आमची प्राथमिक भाषा राहणार आहे. तर नवे जीआर हे केवळ मराठी विद्यार्थ्यांवर केंद्रित धोरणावर आधारित राहील. या निर्णयाबाबत फडणवीस यांनी सांगितले की, GR रद्द करण्यामागील कारण म्हणजे जनभावना, सांस्कृतिक संवेदना, आणि विद्यार्थ्यांवरील भाषिक ओझे लक्षात घेता, हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच GR रद्दीकरणासोबत डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक नविन “त्रिभाषा सूत्र पुनर्विचार समिती” स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. Maharashtra Govt
तीन महिन्यांच्या आत अहवाल सादर करणार
या संदर्भात डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही समिती तीन महिन्यांच्या आत अहवाल सादर करणार आहे. वास्तविक अशा प्रकारची समिती स्थापन करण्याची आवश्यकताच नसल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. कोणत्याही परिस्थितीत अशा प्रकारे त्रिभाषा सूत्र स्वीकारणार नाही, अशी भूमिका राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मांडलेली आहे. त्यामुळे अशा समिती स्थापन करणे म्हणजे, वेळ आणि पैशांचा अपव्यय असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचे हित पाहू, कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही – मुख्यमंत्री
हा अहवाल उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारला होता. त्यानंतर नेहमीच्या सवयीप्रमाणे घुमजाव केले. त्यानंतरही आम्ही कोणताही इगो न मानता त्यासंदर्भातील निर्णय केला आहे. मी पुन्हा एकदा सांगतो. आम्ही निर्णय केला, आता समिती स्थापन केली आहे. ही समितीच आता योग्य ते ठरवेल. आम्ही कोणत्याही पक्षाचे हित पाहणार नाही. आम्ही महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचे हित पाहू. महाराष्ट्राचे सरकार विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय घेईल. आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीस यांनी यावेळी ठाकरे बंधूंच्या विजयी मोर्चा वरही भाष्य केले. ते म्हणाले की, ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर मला त्याचा अतिशय आनंद आहे. त्यांनी जरूर एकत्र यावे. फक्त राज ठाकरे यांनी पहिली ते बारावीपर्यंत हिंदी सक्तीची सक्ती करण्याचा निर्णय तुमच्या काळात का घेण्यात आला हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांना विचारला पाहिजे. बाकी त्यांनी एकत्र येऊन क्रिकेट खेळावे, हॉकी खेळावी, टेनिस खेळावे, स्वीमिंग करावी, जेवण करावे आम्हाला काही अडचण नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App